Rabi Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बीचा पेरा ३१ हजार हेक्टरवर

Rabi Season 2024 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे रब्बीचे सर्व साधारण क्षेत्र १ लाख ९९ हजार हेक्टर इतके आहे. गतवर्षी २ लाख १९ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी २ लाख २० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्या तुलनेत जवळपास ३१ हजार हेक्टरवर जिल्हाभरात पेरणी आटोपली असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे रब्बीचे सर्व साधारण क्षेत्र १ लाख ९९ हजार हेक्टर इतके आहे. गतवर्षी २ लाख १९ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. त्यातही जवळपास ८० टक्के पेरणी नोव्हेंबरनंतर झाली होती. गतवर्षी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेसा ओलावा नव्हता. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी अनुकूलता स्थिती नव्हती.

Rabi Sowing
Rabi Sowing : नगर जिल्ह्यात रब्बीत साडेचार लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

यंदा मात्र रब्बीसाठी पोषक स्थिती दिसते आहे. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे पावसाळा संपताच अनेक भागांत रब्बीची पेरणी सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात पेरणी झालेली पिके आता चांगलीच वाढीला लागली आहेत.

जिल्ह्यातील प्रस्तावित २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३१ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. गतवर्षी रब्बी ज्वारीच्या पेरणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले होते. यंदा मात्र हरभरा आणि मक्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसतो आहे. वेळेत सुरू झालेल्या पेरणीमुळे यंदा प्रस्तावित क्षेत्राचा आकडा लवकरच गाठला जाईल अशी आशा कृषी विभागाला आहे.

१०:२६:२६ खताचा तुटवडा

यंदाच्या रब्बी हंगामासाठी छत्रपती संभाजी नगर जिल्हा करता एक लाख ४० हजार टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर आहे. अलीकडेच पार पडलेल्या खरीप हंगामातील जवळपास ६८,६२४ युरिया, डीएपी, संयुक्त खते, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश आदी रासायनिक खते उपलब्ध आहेत. शिवाय रब्बीच्या हंगामासाठी मंजूर आवंटणापैकी जवळपास १२ हजार टन रासायनिक खताचा पुरवठा पहिल्या टप्प्यात झाला आहे.

Rabi Sowing
Sangli Rabi Sowing : सांगलीत रब्बी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता

त्यामध्ये १०:२६:२६ या रासायनिक खताची मात्र एक गोणी ही जिल्ह्याच्या वाट्याला नाही. त्यामुळे मागणी असूनही १०:२६:२६ या खताची उपलब्धता बाजारपेठेत नसल्याची स्थिती आहे. अलीकडेच कृषी विभागाकडून कृषी आयुक्तालयाकडे १०:२६:२६ खताची किमान एकरात तरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे पत्र पाठवण्यात आल्याचे माहिती कृषी विभागाच्या यंत्रणेने दिली.

पावसामुळे काही भागांत पेरणीला विलंब

ज्या भागामध्ये अति पाऊस झाला किंवा अजूनही पाऊस होतो आहे. अशा भागात मात्र रब्बी पेरणी अजून सुरू झाली नाही. काही भागातील शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी रान तयार करण्यातही पावसाने खोडा घालण्याचे काम केल्याची स्थिती आहे.

ज्वारी व हरभऱ्याचे क्षेत्र कसे वाढेल त्यामध्ये टोकन किंवा बीबीएफ पद्धतीने पेरणीकडे शेतकरी कसे वळतील याविषयी कृषी विभाग प्रयत्न करेल.
- पी. आर. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com