Pune News : मॉन्सूनोत्तर पाऊस गेल्यानंतर जिल्ह्यात रब्बीच्या शेतीकामांना वेग येऊ लागला आहे. काही ठिकाणी ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तर ज्वारीच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. रब्बीचे एकूण दोन लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत ५६ हजार ३४५ हेक्टर म्हणजेच सरासरी २५ टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
यंदा पावसाळ्यात जास्त पाऊस झाला आहे. भूजल पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात हवामान कोरडे झाले आहे. खरिपातील रखडलेल्या पिकांच्या काढणीला वेग आला आहे. त्यातच ऑक्टोबरमध्ये वाढलेल्या उन्हाच्या चटक्यामुळे जमिनीतील ओलावा काहीसा कमी होऊ लागला आहे. परतीचा व मॉन्सूनोत्तर पाऊस झाल्याने काही ठिकामी शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. आता रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकरी कर्ज काढून रब्बीची तयारी करू लागला आहे.
थंडीची चाहुल लागल्याने रब्बीतील पेरणी करण्याच्या तयारीत शेतकरी आहे. चालू वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्वारी व हरभरा पिकांच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. काही शेतकऱ्यांनी ज्वारी पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी लवकर पेरणी केलेल्या ज्वारी उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, गहू व हरभरा पिकांच्या पेरण्यांना पोषक वातावरण असल्याने या पेरण्यांना सुरुवात होऊन दीड ते दोन महिन्यांत पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
सध्या खरीप हंगामातील भात पिके निसवण्याच्या व दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहेत. मूग पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. सोयाबीनची ठिकाणी काढणी सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. नुकसानीमुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेत ५० ते ६० टक्के घट येण्याची शक्यता आहे. मका पिकाची काढणी सुरू असून २५ टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झालेली आहे. भुईमूग पिकाची ५० टक्के क्षेत्रावरील काढणी पूर्ण झाली आहे. खरीप पिकांची काढणी सुरू असल्याने रब्बी हंगामाच्या पिकांची पेरणी लांबली आहे. रब्बी ज्वारी, मका पिकांच्या पेरणीस सुरुवात झाली आहे.
पुणे जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र
रब्बी ज्वारी १,३४,३३६ ४६,८५९
गहू ३९,८०३ ३६८
मका १६,९४७ ७२१७
इतर रब्बी तृणधान्य २७१ ०
हरभरा ३४,३३० १०६९
इतर रब्बी कडधान्य ३८२९ ७९३
करडई २३ १२
तीळ ५ १
जवस ११ ०
सुर्यफूल ६६ २२
इतर रब्बी गळीतधान्य ९१ ३
एकूण २,२९,७१२ ५६,३४५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.