Rabi Sowing : राज्यात रब्बीची सहा टक्के पेरणी

Rabi Season 2024 : राज्यात पाऊस थांबला असल्याने रब्बी पेरण्या सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यात सरासरीच्या सहा टक्के पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : राज्यात पाऊस थांबला असल्याने रब्बी पेरण्या सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यात सरासरीच्या सहा टक्के पेरणी झाली आहे. अहिल्यानगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांनी पेरणीत आघाडी घेतली आहे. यंदा पाण्याची स्थिती चांगली असल्याने ज्वारीसह हरभरा, गव्हाला प्राधान्य राहील असे चित्र आहे. या कालावधीतील गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र कमी पेरणी झाली आहे.

राज्यात रब्बीचे ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत २ लाख ९४ हजार ८२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत ३ लाख २९ हजार ९७१ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामुळे यंदाची स्थिती पाहिली, तर जवळपास पस्तीस हजार हेक्टरने कमी पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस गेला तरी मागील पंधरा दिवसांत अवकाळी पाऊस सुरू होता. त्यामुळे अजूनही अनेक भागांत वाफसा नसल्याने पेरणीला अडथळे येत आहेत.

Rabi Sowing
Rabi Season 2024 : यंदा रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

राज्यात १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर ज्वारीचे क्षेत्र आहे. आत्तातापर्यंत १ लाख ५५ हजार ६३६ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांत ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे. सांगली, साताऱ्यातही ज्वारी पेरू लागले आहेत. २ लाख ५८ हजार ३६१ सरासरी हेक्टर क्षेत्रापैकी २८ हजार हेक्टरवर मका पेरलीय.

Rabi Sowing
Rabi Season 2024 : मराठवाड्यात रब्बी पेरणीची गती मंद

हरभऱ्याचे २१ लाख ५२ हजार हेक्टर व गव्हाचे १० लाख ४८ हजार ८०७ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. अजून हरभरा व गव्हाच्या पेरणीला फारशी सुरुवात झाली नाही. हरभऱ्याची आतापर्यंत ७ हजार ६७८ हेक्टरवर तर गव्हाची आतापर्यंत ९३० हेक्टरवर पेरणी झालीय.

थंडीचा कडाका वाढल्यानंतर गव्हाच्या पेरणीला वेग येणार आहे. यंदा गहू, हरभरा, कांद्याचेही क्षेत्र वाढेल असा कृषी विभागातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. आतापर्यंतचा रब्बी पेरणीचा विचार करता दहा जिल्ह्यात पेरणीला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. बाकी जिल्ह्यांत पेरणीचे क्षेत्र आतापर्यंत तरी अल्प आहे.

आतापर्यंत झालेली पेरणी (टक्के)

पुणे : २४.५३, नगर : २३.८१, सोलापूर : १४.४८, सातारा : ८.७०, सांगली : ३.३०, छत्रपती संभाजीनगर : ६.६३, परभणी : ५.१२, हिंगोली : २.४४, गडचिरोली : २.८९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com