एकीकडे राज्यात ऊस गाळप हंगामाने वेग पकडला असून दुसरीकडे साखर निर्यातीही सुरुजानेवारीच्या मध्यापर्यंत पुरवठ्यासाठी आतापर्यंत सुमारे १ लाख टन साखरेच्या निर्यातीचे करार पूर्णभारतीय साखरेच्या खरेदीसाठी अफगाणिस्तान, श्रीलंका, सोमालिया, येमेन, केनिया आणि मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील देश इच्छुकचालू साखर हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत साखर उत्पादन ५० टक्क्यांनी वाढले.Sakhar Niryat: एकीकडे राज्यात ऊस गाळप हंगामाने वेग पकडला असून दुसरीकडे साखर निर्यातीही सुरु झाली आहे. १४ नोव्हेंबर रोजी सरकारने साखर कारखान्यांना २०२५-२६ हंगामात १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. आता प्रत्यक्षात निर्यात सुरु झाली आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत साखरेच्या पुरवठ्यासाठी आतापर्यंत सुमारे १ लाख टन साखरेच्या निर्यातीचे करार पूर्ण झाले आहेत, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले..साखर निर्यातील परवानगी दिल्यानंतर, अशी चिंता व्यक्त केली जात होती की भारतीय साखर जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तग धरू शकणार नाही. परंतु रुपया आता डॉलरच्या तुलनेत ९० च्या टप्प्यापेक्षा घसरल्याने, पुढील काही दिवसांत आणखी काही करार होण्याची शक्यता आहे, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य ८८ असतानाही १ लाख टन साखर निर्यातीचे करार करण्यात आले होते, असेही त्यांनी नमूद केले..भारतीय साखरेच्या खरेदीसाठी अफगाणिस्तान, श्रीलंका, सोमालिया, येमेन, केनिया आणि मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील काही इतर देश इच्छुक आहेत, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले. कराराच्या किमतींबाबत निर्यातदारांमध्ये एकमत नसले तरी, एका निर्यातदाराकडून सांगण्यात आले की, पश्चिम किनाऱ्यावरील बंदरातून निर्यातीसाठी बहुतांश करार प्रतिटन ४४०-४५० डॉलर दराने झाले आहेत..Sugar Production: साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल.एकसमान निर्यात कोटाचेन्नई येथील शेती उत्पादनांची निर्यात करणाऱ्या राजथी ग्रुपचे संचालक एम. मदन प्रकाश यांनी सांगितले की, केनियासाठी साखर निर्यातीचा मालवाहतुकीसह दर प्रतिटन ५१० डॉलर आहे. तर बंदर अब्बास (इराण) साठी दर ४७० डॉलर एवढा आहे. भारतीय साखरेसाठी अनेक शेजारी देशांकडून चांगली मागणी होत असल्याचे ते पुढे म्हणाले..Bidri Sugar Factory: 'बिद्री'कडून प्रतिटन ३,६१४ रुपये दराने ऊसबिले जमा, साखर उतारा १०.८५ टक्के .केंद्रीय अन्न मंत्रालयाने गेल्या महिन्यात सर्व सुरु असलेल्या साखर कारखान्यांना त्यांच्या गेल्या तीन हंगामातील सरासरी उत्पादनाच्या आधारे प्रमाणानुसार कोटा वाटप निश्चित केला होता. "सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या तीन वर्षांच्या सरासरी साखर उत्पादनाच्या आधारावर ५.२८६ टक्के एकसमान कोटा वाटप करण्यात आला आहे," असे सर्व कारखान्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे..सरकारकडून कारखान्यांना स्वतः अथवा व्यापारी निर्यातदार, रिफायनरीज यांच्यामार्फत निर्यातीसाठी परवानगी दिली असून, उत्तर प्रदेशातील अनेक कारखान्यांनी त्यांचा कोटा निर्यातदारांना दिला. हा निर्यात कोटा व्यापार अंदाजानुसार ३० हजार ते ४० हजार टन इतका आहे..राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाने (NFCSF) ने सरकारला, आधीच्या १५ लाख टनांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त १० लाख टन निर्यातीसाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे. "यामुळे देशांतर्गत साखरेच्या दरात सुधारणा होण्यास मदत होईल. तसेच जागतिक बाजारात भारतीय साखर टप्प्याटप्प्याने पोहोचत असल्याने सध्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कमी साखरेच्या दरावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही," असे त्यांनी नुकतेच म्हटले आहे..सहकारी साखर कारखान्यांच्या संघाने असेही नमूद केले आहे की देशांतर्गंत २.९ कोटी टन साखरेचा वापर आणि ५० लाख टन सुरुवातीचा साठा (१ ऑक्टोबर २०२५ रोजी) अपेक्षित धरल्यास भारतातील साखर कारखान्यांच्या गोदामांत सुमारे ७५ लाख टन साखर साठा शिल्लक राहील. यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक कोंडी होऊन त्यांच्यावरील व्याजाचा भार वाढेल..गेल्या आठवड्यात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या खरीप पिकांच्या पहिल्या आगाऊ अंदाजात म्हटले होते की ऊस उत्पादन गेल्या वर्षीच्या ४५४.६ दशलक्ष टनांवरून ४७५.६ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या चालू साखर हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत साखर उत्पादन ५० टक्क्यांनी वाढले आहे. ते ४१ लाख टनांवर गेले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.