Crop Harvesting : खरीप पिकांची काढणी वेगात सुरू

Kharif Crop : यंदा खरीप पेरणीच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली असली तरी उशिराने झालेला अतिपाऊस, पावसाचा खंड यामुळे झालेले नुकसानीमुळे उत्पादनात चांगलीच घट येण्याची शक्यता आहे.
Crop Harvesting
Crop HarvestingAgrowon
Published on
Updated on

Pune News : जिल्ह्यात अधूनमधून होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे खरिपातील पिकांची काढणी वेगाने सुरू झाली आहे. सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या काढण्या आटोपल्या असल्या तरी तूर, बाजरी पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात या बाजरीच्या काढण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात वेळेवर झालेल्या पावसामुळे पेरण्या वेळेत झाल्या. यंदा खरीप पेरणीच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली असली तरी उशिराने झालेला अतिपाऊस, पावसाचा खंड यामुळे झालेले नुकसानीमुळे उत्पादनात चांगलीच घट येण्याची शक्यता आहे.

Crop Harvesting
Crop Harvesting : खरिपातील पिकांच्या काढणीला पावसाचा अडथळा

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी एक लाख ९५ हजार ७१० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाख ३३ हजार ९७० हेक्टर म्हणजेच १२० टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये भाताची ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ६० हजार ८५७ हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरी १०२ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.

तर बाजरीची ४७ हजार ५१८ हेक्टरपैकी ४५ हजार ६९९ हेक्टर म्हणजेच ९६ टक्के, सोयाबीनची २० हजार ९८२ हेक्टरपैकी ५० हजार ८०६ हेक्टर म्हणजेच २४२ टक्के पेरणी झाली होती. तसेच रागी, मका, तीळ, कारळे, सूर्यफूल, भुईमूग या पिकांची चांगली पेरणी झाली होती. सध्या या पिकांची काढणी सुरू आहे.

Crop Harvesting
Kharif Crop Harvesting : पावसाच्या उघडिपीने खरिपाच्या सुगीला गती

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अचानक मॉन्सूनोत्तर पाऊस सुरू झाल्यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. पूर्व भागात सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, कापूस अशा पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.

तर पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत भाताची लागवड केली होती. सध्या भात पिके निसवण्याच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी उशिराने लागवड झालेली भात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी पाऊस कमी असल्याने खाचरांतील पिकांची वाढ खुंटलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com