Rabi Sowing : पुणे जिल्ह्यात ५६ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या

Rabi Season 2024 : पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम महत्त्वाचा मानला जातो. मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खरीप हंगामामध्ये ५० टक्के उत्पादनात घट आली होती.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘परतीचा पाऊस थांबल्याने आता जिल्ह्यामध्ये रब्बीच्या पेरण्यांना वेग घेतला आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करावे लागले होते. मात्र यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ३४५ हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. सरासरीक्षेत्रावर या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत,’’ अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली. पुणे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम महत्त्वाचा मानला जातो. मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खरीप हंगामामध्ये ५० टक्के उत्पादनात घट आली होती.

Rabi Sowing
Sangli Rabi Sowing : सांगलीत रब्बी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता

१५६ पैकी १२८ मंडळांमध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने खरिपामध्ये नुकसान झाले होते. यंदा मात्र जिल्ह्यामध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. यावर्षी जिल्ह्यात तब्बल १ हजार ५२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या १२२ टक्के झाला. परिणामी रब्बीसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तालुक्यांमध्ये देखील पावसाची स्थिती समाधानकारक राहिली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बीचा पेरा ३१ हजार हेक्टरवर

बारामती, इंदापूर, पुरंदर तालुके आघाडीवर

रब्बीमध्ये बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पेरण्या होत असतात. बारामती, शिरूर, इंदापूर आदी तालुक्यांमध्ये रब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणावर होत असते. जिल्ह्यात सर्वात जास्त ज्वारीचे १ लाख ३४ हजार ३३६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या खालोखाल गहू (३९,८०३), हरभरा (३४,३३०), मका (१६,९४७) आदी पिकांची कमी अधिक प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये पेरणी होत असते.

तालुकानिहाय झालेल्या रब्बी पेरण्या (उसाशिवाय)

तालुका पेरणी झालेले क्षेत्र

हवेली ३४३

मुळशी ३४

भोर ०

मावळ ४१

वेल्हे १

जुन्नर २,२६०

खेड ६,८९७

आंबेगाव ५,७३२

शिरूर ११,१६०

बारामती ११,४१९

इंदापूर २,३४१

दौंड २,९०२

पुरंदर १३,२९५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com