माळकिन्ही (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील माधवराव कानडे यांनी हळद. केळी, कापूस अशी व्यावसायिक पिकांची पद्धती अंगीकारली. त्याचबरोबर सुमारे वीस वर्षांपासून गाजराच्या शेतीत सातत्य राखले आहे. उत्पादन व व्यवस्थापन जमून काढणीचे नियोजनही या पिकातून चांगल्या प्रकारे करता येत असल्याचा व त्यातून चांगले अर्थकारण जुळत असल्याचा कानडे यांचा अनुभव आहे..यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात माळकिन्ही गाव आहे. सुमारे आठहजार ते नऊ हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या या गावातील उपजीविकेचे मुख्य साधन शेतीच आहे. पंचक्रोशीत भरणारे आठवडी बाजार तसेच तालुका ठिकाण असलेल्या आर्णी येथे भरणारा रोजचा बाजार यामुळे या भागात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे..Carrot Farming : गाजराच्या शेतीने बदलले बक्षीहिप्परगेचे अर्थकारण.भाजीपाला विक्रीतून ताजा पैसा उपलब्ध होत असल्याने दैनंदिन गरजांची पूर्तता करणे सहज शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होतो. माळकिन्ही गावातील माधवराव कानडे यांनी भाजीपाला पिकांमध्ये आपले वेगळेपण जपले आहे ते म्हणजे वीस वर्षांपासून ते करीत असलेली गाजर शेती. याच पिकाने त्यांच्या एकूणच उत्पन्नाला मोठा हातभार लावला आहे. आर्थिक समस्या ज्या ज्या वेळी आल्या त्या त्या वेळी साथ दिली आहे..कानडे यांची गाजर शेतीकानडे यांची सुमारे १२ एकर शेती आहे. त्यापैकी दरवर्षी तीन-चार एकरांवर गाजराचे क्षेत्र राहते. यंदा ते अडीच एकरांपर्यंत आहे. वीस वर्षांपूर्वी गाव शिवारातील अनेक शेतकरी गाजराचे पीक घेत होते. काही गुंठ्यांवर प्रायोगिक तत्त्वावर लागवड व्हायची. त्यातूनच कानडे यांना प्रेरणा मिळाली. आज गावातील अन्य शेतकरी काही गुंठ्यांपुरतेच या पिकात गुंतले आहेत. मात्र कानडे यांनी या पिकाची साथ कधीच सोडली नाही. एकरी आठ किलोप्रमाणे त्याचा बियाणे दर राहतो..Carrot Grass Control: गाजर गवताच्या निर्मूलनासाठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता.मागील तीन- चार वर्षांपासून ८०० रुपये प्रति किलो असा त्याचा स्थिर दर आहे. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये त्याची लागवड होते. डवऱ्याला दोरी बांधत सरी पाडून घेतली जाते. या माध्यमातून तयार वरंब्यावर बी पेरली जाते. लागवडीपूर्वी दाणेदार खताचा एकरी तीन पोत्यांची मात्रा दिली जाते. त्यानंतर शक्यतो कोणतीही मात्रा, फवारणी करण्याची गरज भासत नसल्याचे कानडे सांगतात. लागवड १५ नोव्हेंबरनंतर होणार नाही याची दक्षता घेतली जाते. कारण काढणीच्या हंगामात तापमानात वाढ होऊ लागते. कंदधारणा होत नाही असा अनुभव आहे..काढणीवर सर्वाधिक खर्चगाजरात सर्वाधिक म्हणजे एकरी २० हजार ते २२ हजार रुपयांपर्यंतचा खर्च काढणीसाठीच्या मजुरीवर होतो. बैल नांगराच्या मदतीने गाजर जमिनीबाहेर काढले जातात. वेचणी करून ढीग लावला जातो. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर गाजर धुणे व पोत्यांमध्ये भरून मार्केटला पाठविण्याची प्रक्रिया पार पडते. दर दिवशी १० ते १५ पोती काढणी होते. बाजाराचा अंदाज घेत किती माल पाठवायचा याचे नियोजन केले जाते. कानडे सांगतात, की मागील वर्षी गाजराला प्रति किलो २० रुपये दर मिळाला होता..Carrot Crop Disease: गाजर पिकातील भुरी रोग .दरवर्षी १०, १२, १५ ते २० रुपयांच्या दरम्यानच दर राहतात. जानेवारीत म्हणजे मकर संक्रांतीसाठी गाजराला मोठी मागणी असते. या भागातील विविध गावांमध्ये आठवडी बाजार भरतात. त्यामुळे विक्रीसाठी सातही दिवसांची ही बाजारपेठ व्यवस्था कानडे यांच्यासाठी किफायतशीर ठरली आहे. एकरी उत्पादन, त्यासाठीचे व्यवस्थापन जमून काढणीचे नियोजनही या पिकाचे चांगल्या प्रकारे करता येते व त्यातून चांगले अर्थकारण जुळत असल्याचे कानडे सांगतात..अन्य व्यावसायिक पिकांची साथअन्य व्यावसायिक पिकांमध्ये हळद एक एकर, केळी अडीच एकर, कापूस चार एकर, सोयाबीन चार एकर याप्रमाणे पीकपद्धती जपली आहे. हळदीचे एकरी वीस क्विंटलपर्यंत उत्पादकता होते. हिंगोली बाजारपेठेत विक्री होते. बेणेविक्रीतून फायदा मिळविण्याचा कानडे यांचा प्रयत्न असतो. सध्या हळदीला चांगला दर मिळत असून चांगला परतावा मिळेल अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. १० वर्षांपासून केळी लागवडीत सातत्य आहे. एकरी सरासरी २० टनांपर्यंतची केळीची उत्पादकता मिळते. परंतु दरांची साथ मिळत नसल्याची समस्या सातत्याने उद्भवत असल्याचे ते सांगतात..Carrot Market : गाजराच्या दरात तेजी ; २००० रुपये क्विंटलचा गाठला पल्ला.माळकिन्ही गावाचे बाजारातील महत्त्व माळकिन्ही गावातील ८५ ते ९० टक्के शेतकरी भाजीपाला उत्पादक आहेत. यातील दहा टक्के शेतकरी गाजराचे उत्पादन घेतात. गावातील अनेक शेतकरी गाजराचे उत्पादन घेतात. येथील व्यापारी गोपाल माळघट म्हणाले, की जानेवारी ते मार्च असा गाजराचा विक्री हंगाम असतो. दरांविषयी बोलायचे तर घाऊक दर प्रति क्विंटल १२०० रुपयांपर्यंत तर कमाल दर दोन हजार रुपयांपर्यंत राहतात..किरकोळ बाजारात ५००० ते ६००० रुपये प्रति क्विंटल दराने व्यवहार होतात. गावातील भाजीपाला उत्पादकांकडून खरेदी करून शेतीमाल आठवडी बाजारात विक्री करणारे आमच्यासारखे व्यापारी तयार झाले आहेत. सध्या गावात १५ ते २० भाजीपाला व्यापारी आहेत. एकंदरीतच आमच्या गावातून भाजीपाला आठवडी बाजारात गेल्याशिवाय बाजार भरत नाही, अशी स्थिती आहे..शेतीतून उल्लेखनीय प्रगतीकानडे यांना नंदकिशोर, नीलेश, अविनाश अशी तीन मुले आहेत. पैकी दोघांवर शेतीची जबाबदारी आहे. पत्नी ध्रुपदाबाई देखील शेतीत राबतात. मुलगा नंदकिशोरने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून (दापोली) पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच बंगळूर येथील संस्थेतून पीएच.डी. पदवी देखील प्राप्त केली आहे. त्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेची शिष्यवृत्ती मिळाली आहे. सुरुवातीची काही वर्षे कानडे कुटुंबीय गावात राहत होते. मात्र शेतीकडे २४ तास लक्ष राहावे या उद्देशाने सात वर्षांपूर्वी शेतातच घर बांधले. याचबरोबर गावातही त्यांनी टुमदार घर बांधले आहे. शेतीतूनच हे सारे करणे शक्य झाल्याचे कानडे अभिमानाने सांगतात.माधवराव कानडे ८२६२०१६३७५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.