Jowar Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Sowing : गडहिंग्लजमध्ये रब्बीची चाहुल; ज्वारीची पेरणी सुरू

Rabi Sowing : यंदाच्या पावसामुळे विहिरी, कूपनलिकांना असलेले मुबलक पाणी आणि मध्यमसह लघू पाटबंधारेचे सर्व प्रकल्प शंभर टक्के भरल्याने छप्पर फाडके पाणी उपलब्ध आहे.

Team Agrowon

Kolhapur News : यंदाच्या पावसामुळे विहिरी, कूपनलिकांना असलेले मुबलक पाणी आणि मध्यमसह लघू पाटबंधारेचे सर्व प्रकल्प शंभर टक्के भरल्याने छप्पर फाडके पाणी उपलब्ध आहे. त्याचा परिणाम ऊस क्षेत्र वाढीवर होणार आहे.

गतवर्षी प्रमाणे यंदाही साधारण एक हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढण्याचे संकेत कृषी विभागाने वर्तवले आहे. दरम्यान, रब्बी हंगामाची चाहुल शेतकऱ्यांना लागली असून रब्बी ज्वारीची पेरणी हळूहळू वाढू लागली आहे.

यावर्षी पाणीसाठ्याच्या दृष्टिने पाऊसमान चांगला झाला आहे. मात्र खरीप पिकांना त्याचा फटका बसला आहे. त्याची तूट भरून काढायची म्हणून शेतकरी आता रब्बी हंगामासाठी सज्ज झाला आहे. विशेष करून खरिपाची तूट ऊस लागणीतून भरून काढण्याचा प्रयत्न अधिक होणार असल्याचे सांगण्यात येते.

विशेष म्हणजे चांगल्या पावसामुळे या उपविभागातील सर्वच मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तालुक्यातील सहा लघू पाटबंधारे तलावही तुटुंब झाले आहेत. शिवाय विहिरी व कूपनलिकांचे पाणी वाढले आहे.

विविध माध्यमांतून उपलब्ध झालेल्या मुबलक पाण्यामुळे शेतकरी ऊस या नगदी पिकाकडे वळण्याचे संकेत आहेत. यंदा तुटून जाणारा ऊस १४ हजार हेक्टरचा आहे. यावर्षी नवीन लागण वाढून त्यात साधारण ८०० ते एक हजार हेक्टरची भर पडण्याची शक्यता आहे.

जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत उसाची लागण सुरू असते. दोन ते तीन वर्षांचा खोडवा काढून नवीन ऊस लागणही काही शेतकरी करीत असतात. सोयाबीन, भात काढणीनंतर तेथे उसाची लागण होत असल्याने यंदा क्षेत्र वाढण्याचे संकेत आहेत.

रब्बी हंगामात तालुक्यात ज्वारीची पेरणी अधिक असते. आतापर्यंत ६५० हेक्टरमध्ये ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीनंतर मका, गहू, हरभरा या पिकांचीही पेरणी तालुक्यात होते. दिवाळीनंतर हरभऱ्याची पेरणी सुरू होईल. बहुतांशी जमिनीत वाफसा न आल्याने पेरणी खोळंबली आहे. साधारण दिवाळीनंतरच ज्वारीसह सर्वच रब्बी पिकांच्या पेरणींना गती येणार असल्याचे प्रभारी कृषी अधिकारी हरिदास बोंगे यांनी सांगितले.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे दुबार पेरणी

तालुक्यात काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या काढणीनंतर लगेचच ओलीमध्ये ज्वारी पेरली. परंतु आठवडाभराच्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे काही ठिकाणच्या बिया वाहून गेल्याचा प्रकार घडला. तेथे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. काहींच्या शेतात अंकुर फुटले होते. ते अतिपाण्याने कुजूनही गेल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farming : दर्जेदार तांदूळ उत्पादनात नाव कमावलेले आमळी

Maharashtra Development : लक्षात घ्या विकसित महाराष्ट्रासमोरील आव्हाने

Trump Trade Tariffs : अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीमुळे कापड, कोळंबी, सोयापेंडला फटका

Malegaon Blast : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Animal Husbandry : पशुपालकांना वीज, कर, व्याज सवलत

SCROLL FOR NEXT