Inspirational Story: संसार चालविण्यासाठी अर्जुन कामं शोधू लागला. त्याने घाटाखाली सुरक्षा रक्षक म्हणून तीन हजार रुपये महिन्याची नोकरी पकडली. त्यासाठी वाडीतून रोज सहा तासाची पायपीट करीत तो घाटवाटेने कामाला ये-जा करू लागला. उषादेखील मजुरी करून संसाराला हातभार लावत होती.