बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात दोषीआंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावलीप्राणघातक शस्त्रांचा वापर केल्याने अनेक आंदोलकांचा मृत्यूशेख हसीना यांच्या आदेशानुसार हे कृत्य करण्यात आलेहे त्यांचे कृत्य मानवतेविरुद्ध असल्याचा ठपका .Sheikh Hasina verdict: बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT-BD) सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यात दोषी ठरवले. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गेल्या वर्षी विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले होते. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी हसीना यांच्या सरकारने कारवाईचे आदेश दिले होते. यामुळे मोठा हिंसाचार उसळला होता. यात असंख्य आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याबाबतच्या खटल्यात शेख हसीना यांना दोषी ठरविण्यात आले..बांगलादेशात स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वारसांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाविरोधात विद्यार्थी आणि त्यांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या. या मोठ्या उठावानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडवा लागला. बांगलादेशातील विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाने हसीना यांचे आवामी लीग सरकार उलथवून टाकले..Saudi Arabia Bus Accident: सौदी अरेबियामध्ये भीषण अपघात, मक्काहून मदिनाला जाणाऱ्या ४२ भारतीयांचा मृत्यू, डिझेल टँकरला बसची धडक.त्यांच्यावरील आरोपपत्रानुसार, न्यायाधिकरणाने म्हटले आहे, “शेख हसीना यांचे कृत्य मानवतेविरुद्ध आहे. ५ ऑगस्ट रोजी चांखारपूल येथे प्राणघातक शस्त्रांचा वापर केल्याने सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यांनी आदेश जारी केला आणि तत्कालीन गृहमंत्री आणि पोलिस महानिरीक्षक यांच्या निष्क्रियतेमुळे, विद्यार्थ्यांचा बळी गेला. पंतप्रधान शेख हसीना यांच्या आदेशानुसार हे कृत्य करण्यात आले. हे त्यांचे कृत्य मानवतेविरुद्ध आहे.".न्यायालयाने त्यांना विद्यार्थी आंदोलनावेळी थेट आदेश जारी करणे आणि हत्या रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल जबाबदार धरले आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांनाही फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर माजी पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-ममून यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे..Nitish Kumar Resigns: सत्ता स्थापनेच्या हालचाली, नितीश कुमारांचा राजीनामा, बिहारमध्ये महाराष्ट्राचा फॉर्म्युला लागू होणार का? .या निकालापूर्वी, हसीना यांनी दावा केला होता की न्यायालयावर त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे नियंत्रण आहे. त्यांचा अवामी लीगची प्रतिमा मलिन करण्याचा आणि स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न आहे..ऑगस्ट २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या निदर्शनामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्या देशात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या पंतप्रधान आहेत. पण हसीना यांच्यावर अनेक आरोप झाले..संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या अहवालानुसार, जुलैमधील उठावानंतर हसीना यांच्या सरकारने मोठ्या सुरक्षा कारवाईचे आदेश दिले. या हिंसाचारात १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान १,४०० लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.