Nashik News : अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले तरी त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी सुरू केली आहे. मुबलक पाण्यामुळे यंदा गहू, हरभरा, उन्हाळ कांदा व मक्याच्या क्षेत्रात भरघोस वाढ होण्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी वर्तविला आहे. .कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बीचे एक लाख १४ हजार ५०० हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आतापर्यंत दोन हजार ९७७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. थंडीला सुरवात झाल्याने गहू, हरभरा पेरणीने गती घेतली असून, एक हजार ८५ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली. गहू ९४९ हेक्टर, मका ७७० हेक्टर, ज्वारीच्या १७३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. सिन्नर, येवला, चांदवड, कळवण व नांदगाव तालुक्यांतही पेरणीचीनोंद आहे..Rabi Season : यंदा हरभरा, गहू पिकाचे लागवड क्षेत्र वाढणार .नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, सुरगाणा भागातील भातकापणीला लांबलेल्या पावसाने काहीसा विलंब झाला. काही दिवसांपासून वातावरणात गारवा वाढत असल्याने आणि ओलाव्याची स्थिती सुधारल्याने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरण्यांना गती येण्याची शक्यता आहे..अतिवृष्टी व आतापर्यंत सुरू असलेल्या अवकाळीमुळे जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी खोळंबली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ तीन हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. रब्बी हंगामासाठी ५० हजार ३०३ क्विंटल बियाणे मंजूर झाले आहे..Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा, हळदेला आधार; संत्रा आवक कमी, कांदा स्थिर, गहू दर हमीभावावर टिकला.आतापर्यंत २२ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा असून, यात नऊ हजार ७३६ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. यात ज्वारी ११९ क्विंटल, गहू सात हजार १४३ क्विंटल, हरभरा एक हजार २४२ क्विंटल, मका एक हजार २३० क्विंटल यांचा समावेश आहे..दीड ते दोन महिने विलंबमेपासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरअखेर म्हणजे तब्बल सहा महिने सुरू राहिला. अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान झाले. त्याचा विपरीत परिणाम रब्बी हंगामावर झाला असून, दीड ते दोन महिने पेरणीला विलंब झाला आहे. शेतातील पाणी, जमिनीतील पोषकता लक्षात घेता रब्बी हंगामातील पेरणीला उशीर होत आहे. थंडी वाढत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केल्याने पेरणीचा आकडा वाढत जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.