Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : सोलापूर बाजार समितीत चार महिन्यांत ६२५ कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी

Solapur APMC Update : यंदाच्या कांदा हंगामात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या चार महिन्यात ६२५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा कांद्याची खरेदी झाली.

Team Agrowon

Solapur News : यंदाच्या कांदा हंगामात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या चार महिन्यात ६२५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा कांद्याची खरेदी झाली. यातून बाजार समितीला जवळपास ६ कोटी २५ लाख रुपयांचा सेस तर अडत्यांना ३७ कोटी रुपयांचा नफा झाला.

तर हमालांना तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले, पण शेतकऱ्यांच्या वाट्याला मात्र म्हणावा तेवढा नफा आलेला नाही. उलट घसरत्या दरामुळे निराशाच पदरी पडली आहे. राज्यात नाशिकनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांद्याच्या खरेदी-विक्रीत मोठा नावलौकिक झाला आहे.

गेल्या चार महिन्याच्या कालावधीत राज्यात सर्वात जास्त कांदा आवक सोलापूर बाजार समितीमध्ये झाली. कांदा विक्रीतून बाजार समितीला सेस, बाजार फी व इतर घराच्या रूपाने कोट्यावधी रुपयांचा लाभ झाला. बाजार समितीत दररोज शेकडो छोट्या व मोठ्या वाहनातून कांद्याची आवक होते,

जवळपास सर्वच कांदा वाहतूकदार प्रति कांदा पिशवी भाडे शेतकऱ्यांकडून वसूल करतात, त्याचबरोबर या वाहतूकदारांना अडत्यांकडूनही वेगळे कमिशन मिळते ते वेगळेच. पण या सगळ्यात मात्र शेतकऱ्यांची मात्र निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरल्याने पुरती कोंडी झाली.

गेल्या चार महिन्यात सप्टेंबरमध्ये २ लाख ९५ हजार ७४ क्विंटल कांद्याची खरेदी झाली, तर अॅाक्टोबरमध्ये ४ लाख ५८ हजार ६७६ क्विंटल, नोव्हेंबरमध्ये ७ लाख २५ हजार १६८ क्विंटल तर डिसेंबरमध्ये सर्वाधिक १३ लाख ४६ हजार ५६७ क्विंटल कांद्याची खरेदी झाली. साधारण ६२५ कोटीच्या कांद्याची खरेदी झाली आहे.

कांद्याचे दर सध्या किमान १०० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये इतके आहेत. निर्यातबंदी आधी हाच दर सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० ते ५००० रुपयांवर होता. पण त्यात निम्म्याने घसरण झाली आहे. परिणामी, शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांना दर वाढतील, अशी आशा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT