Onion Market : आता सरकार ठेवणार कांद्याच्या व्यवहारांवर लक्ष; लाँच करणार नवीन पोर्टल?

Central Government Monitoring Onion Market : सध्या कांद्याचे भाव हे पडले आहेत. तर कांदा निर्यातबंदी घातल्यानेच त्यात भर पडली आहे अशी टीका विरोधकांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकारवर केली जात आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून कांद्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : आता कांद्याशी संबंधित व्यवहारांवर नजर ठेवण्याचे धोरण सरकारकडून आखले जात आहे. त्यासाठी सरकारकडून नवीन पोर्टल लाँच केले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाफेड म्हणजेच नॅशनल अॅग्रीकल्चर को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया कांदा खरेदी विक्रीची सुविधा देत आहे

सध्या नवीन कांद्याची आवक ही देशाच्या विविध बाजार समित्यांमध्ये होत आहे. यावेळी कांद्याची खरेदी, विक्री आणि स्टॉकच्या संदर्भात योग्य माहिती घेण्यासह लक्ष ठेवण्यासाठी नवीन पोर्टल लाँच करण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. तसेच कांद्याच्या भावावर हस्तक्षेप करण्यासाठी या नवीन पोर्टलचा वापर सरकारकडून होऊ शकतो.

Onion Market
Ground Report : गारपीटीमुळे कांद्याचे प्रचंड नुकसान | Agrowon | ॲग्रोवन

याआधी केंद्र सरकारकडून वाढणाऱ्या कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदी घालण्यात आली.

काय गरज नवीन पोर्टलची

नाफेडकडून देशातील कांद्याच्या बाबतीत दर आणि स्टॉकवर लक्ष ठेवले जात आहे. या मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच सरकारकडून दरावर नियंत्रण ठेवण्यासह इतर उपाययोजना केल्या जातात.

Onion Market
Crop Damage In Paithan : पैठणमधील लोहगावात वादळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान

किमतीच्या फेरफारासाठी उपयुक्त

केंद्र सरकारकडून नवीन पोर्टल लाँच करण्याची योजना आखण्यात येत असून सध्या ही प्रारंभिक अवस्थेत आहे. यातील डेटा हा फक्त सरकारसाठी असणार आहे. तो सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध नसेल असे लाईव्ह मिंटच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

तसेच या रिपोर्टनुसार हा डेटा फक्त सरकारसाठी असणार आहे. तर या डेटाच्या माध्यमातून व्यापारी बाजार आणि किमतीत फेरफार करण्यासाठी होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com