Onion Market : कांदा दरात घसरण सुरूच

Onion Export Ban : देशांतर्गत कांद्याचा पुरवठा व्हावा व दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ७ डिसेंबर रोजी निर्यातबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फास ठरत आहे.
Onion Market
Onion Market Agrowon

Nashik News : नोव्हेंबर २०२३ मध्ये खरीप कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आवक मर्यादित होती. तेव्हा प्रतिक्विंटल ३,५०० रुपयांपर्यंत सरासरी दर होते. मात्र निर्यातबंदीमुळे क्विंटलमागे १८०० ते १९०० रुपयांपर्यंत घसरण झाल्याने आजवर १७०० कोटी रुपयांपर्यंत तोटा राज्यातील कांदा उत्पादकांचा आहे.

मात्र एकीकडे निर्यातबंदी, तर दुसरीकडे देशांतर्गत पुरवठा मंदावल्याने जानेवारीच्या सुरुवातीला १८०० ते १९०० रुपयांवरून दर १३०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे क्विंटलमागे ६०० रुपयांपर्यंत तोटा सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवसेंदिवस कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी वाढत असल्याची गंभीर स्थिती आहे.

देशांतर्गत कांद्याचा पुरवठा व्हावा व दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने ७ डिसेंबर रोजी निर्यातबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फास ठरत आहे. राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्टा असलेल्या नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, मुंगसे या बाजार आवारांमध्ये कांद्याला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सरासरी १८०० ते २००० रुपयांपर्यंत सरासरी दर होता.

Onion Market
Onion Market: निवडणुकांपर्यंत कांदा स्वस्तच राहणार का? कांद्यासाठी शेजारच्या देशांची मागणी असतानाही सरकार निर्यातबंदीवर ठाम

आता कांद्याची आवक वाढत गेली; मात्र देशांतर्गत पुरवठा मंदावल्याने दरावर परिणाम दिसून येत आहे. तुलनेत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ यांच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत खरेदी स्पर्धात्मक नाही.

शिवाय कांदा व्यापारी दरापेक्षा कमी दराने देशावर पुरवठा करून दर पाडले जात आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना विक्रीत स्पर्धा करता येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ‘सरकारी धोरण आणि प्रत्यक्षात कांदा उत्पादकांचे मरण’ अशी प्रत्यक्ष स्थिती कांदाविषयक निर्णयामुळे सध्या शेतकऱ्यांवर आली आहे.

वाढत्या अडचणी

कमी पर्जन्यमान, लागवडीसाठी पाण्याची टंचाई, लांबणीवर गेलेल्या लागवडी अशा प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादक पट्ट्यात यांना लागवडी पूर्ण झाल्या. त्यात ३० ते ४० क्विंटल एकरी उत्पादकता कमी आहे.

त्यामुळे उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने कोंडी वाढली आहे. किमान दर १०० रुपये इतकी नीचांकी बोली लागत असल्याने कांदा उत्पादकांनी पुढील हंगामात नेमके उभे कसे राहायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Onion Market
Onion Market : कांद्याला मिळेना उत्पादन खर्चाएवढाही भाव

राज्यातील प्रमुख बाजारातील कांदा दर स्थिती (१९ जानेवारी) ः

बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी

सोलापूर...५६,४२८...१००...३,२००...१,३००

लासलगाव...१९,३९०...६००...१,५४९...१,३००

विंचूर (लासलगाव)...१९,७७५...४००...१,६००...१,३५०

पिंपळगाव बसवंत...१३,९४६...३००...१,८३१...१,४५०

येवला...१५,९५०...३५०...१,४२५...१,३००

आंदरसूल (येवला)...१६,८३५...४००...१,४२६...१,२७५

मुंगसे (मालेगाव)...२०,०००...५००...१,५३७...१,४५०

पारनेर...१७,६६९...३००...२,०००...१,४००

नांदगाव...१६,८८७...१००...१,४७५...१,२०१

उमराणे...१५,५००...७५१...१,६५१...१,३५०

पुणे...१६,६६२...७००...१,९००...१,३००

(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

घटलेले उत्पादन व मिळणारा सध्याचा भाव यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे कांदा काढल्यानंतर नांगरणी करण्यासाठी सुद्धा पैसे वाचतील की नाही अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे मरण केले आहे.
- रामदास गांगुर्डे, कांदा उत्पादक, निंबाळे, ता. चांदवड, जि. नाशिक
यंदा प्रतिकूल परिस्थिती, तुलनेत उत्पादन खर्चही वाढलेला होता. अगोदरच निर्यातबंदीमुळे दरात मोठी घसरण झालेली आहे. प्रत्यक्षात आता बाजार समितीमध्ये आवक वाढलेली असल्याने निर्यातबंदी मागे घेण्याची गरज आहे; अन्यथा दरात अजून घसरण होऊ शकते. त्यामुळे किमान उत्पादन खर्च वसूल होईल यासाठी सरकारने आता धोरण हाती घेतले पाहिजे.
-बी. एन. फंड पाटील, कांदा उत्पादक, सारोळा अडवाई, ता. पारनेर, जि. नगर
सध्या तुलनेत देशावर पुरवठा होत नाही. नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमांतून देशात कमी दराने विक्री होत आहे. परिणामी, बाजारात उठाव नाही. आता आंध्र प्रदेश, तेलंगणा व पश्‍चिम बंगाल या राज्यांत स्थानिक कांद्याची आवक सुरू होईल. त्यामुळे असेच राहिल्यास दरात अजून घसरण होऊ शकते.
- विजय बाफणा, अध्यक्ष, पिंपळगाव बसवंत, कांदा व्यापारी असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com