Onion Rate : केंद्र सरकार दोन लाख टन कांद्याची खरेदी करणार; वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची घोषणा

Onion Export Duty : केंद्र सरकार २ लाख टन कांदा २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दरानं खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.
Piyush Goyal
Piyush GoyalAgrowon

Onion News Today : केंद्र सरकार २ लाख टन कांदा २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दरानं खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते मंगळवारी (ता.२२) पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्र सरकारनं १७ ऑगस्ट रोजी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात बाजार बंद ठेवले. कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मंगळवारी (ता.२२) राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पियूष गोयल यांची भेट घेतली. या भेटीनंतर गोयल यांनी २ लाख टन कांदा नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करण्याची घोषणा केली.

गोयल म्हणाले, "सध्या तरी दोन लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट आहे. परंतु वेळ आली तर खरेदी वाढवू. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नाफेडकडून आजपासून खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल."

पुढे गोयल म्हणाले, "केंद्र सरकारनं यंदा ३ लाख टन कांदा खरेदी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भावही मिळाला. देशात कांद्याचे भाव वाढले आहेत. २०२३ च्या खरीप हंगामात कांदा लागवड उशिरा झाली.

तसेच पावसाच्या उशिरा आगमनामुळे कांदा पिकावर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. तसेच कांद्याचे भावही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले. परंतु तरीही शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी कांदा नाफेडकडून खरेदी सुरू करण्यात आली आहे."

गोयल यांनी देशभरातील कांदा उत्पादकांनी नाफेडला कांदा विकण्याचं आवाहन केलं. गोयल म्हणाले, "देशात जिथे कांदा घेतला जातो, तिथल्या शेतकऱ्यांनी कांदा नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विकावा.

मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात खरेदी करणार आहोत. आज महाराष्ट्रातील लासलगाव, मनमाड, पिंपळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, वैजापुर, अहमदनगर याठिकाणी २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरू केली आहे." अशीही माहिती गोयल यांनी दिली.

टोमॅटोचे भाव कमी करण्यात यश

टोमॅटोचे भाव वाढलेले असताना सरकारनं खरेदी देशातील मोठ्या शहरात टोमॅटो कमी दरात उपलब्ध करून दिला. त्यामुळे टोमॅटोचे दर ९० वरून ४० आणण्यात केंद्र सरकारला यश आल्याचंही पियुष गोयल म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com