Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : रब्बीतील २२ हजार क्‍विंटल धानाची खरेदी

Paddy Buying Centres : गोंदिया जिल्ह्यात मागणीनंतर तब्बल महिनाभराने धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र ७९ धान केंद्रांना मंजुरी असताना प्रत्यक्षात ४० केंद्रे सुरू झाली आहेत.

Team Agrowon

Gondia News : गोंदिया जिल्ह्यात मागणीनंतर तब्बल महिनाभराने धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र ७९ धान केंद्रांना मंजुरी असताना प्रत्यक्षात ४० केंद्रे सुरू झाली आहेत. या केंद्रांत आतापर्यंत २२ हजार ६५५ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित केंद्रांसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

खरीप हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या धानाची भरडाईकामी उचल करण्यात आली नाही. परिणामी हे धान संस्थांच्या गोदामातच पडून आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील खरेदीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या संदर्भाने शेतकऱ्यांचा दबाव वाढल्यानंतर अखेरीस जिल्ह्यात खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली.

त्यानुसार ७९ केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात केवळ ९ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यानंतर आता ज्या संस्थांकडे गोदामाची व्यवस्था आहे, अशा ४० केंद्रांवर धान खरेदीला सुरवात करण्यात आली आहे. उर्वरित केंद्रे लवकरच सुरू होतील, असे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शासकीय धान केंद्रांवर धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार २८० शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केली आहे. मात्र शासकीय केंद्रे सुरू होण्यास झालेला विलंब पाहता अनेक शेतकऱ्यांनी पैशाची गरज भागविण्यासाठी धानाची व्यापाऱ्यांना यापूर्वीच विक्री केल्याची स्थिती आहे.

पावसाचा फटका बसण्याची शक्यता

जिल्हाधिकाऱ्यांनी करारनामे करून धानाची उचल न करणाऱ्या ३४ मिलर्सला काळ्या यादीत टाकण्याची नोटीस बजावली. परंतु त्यानंतरही धानाची उचल करण्यात आलेली नाही. त्यामुळे धान केंद्रावर असलेल्या धानाला पावसाचा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT