Livestock Registration : पशुधनाचे युनिक टॅगिंग करून ऑनलाइन नोंदणी करा

Animal Ear Tagging : राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना शासनामार्फत गाईच्या दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कानामध्ये इअर टॅग लावण्यात आलेले आहेत व त्यांची ऑनलाइन नोंदणी ‘भारत पशुधन पोर्टल’वर करण्यात आली आहे.
Animal Ear Tagging
Animal Ear TaggingAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील दूध उत्पादक पशुपालकांना शासनामार्फत गाईच्या दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे. कानामध्ये इअर टॅग लावण्यात आलेले आहेत व त्यांची ऑनलाइन नोंदणी ‘भारत पशुधन पोर्टल’वर करण्यात आली आहे.

अशाच दुधाळ गाईंसाठी शासनाचे अनुदान देय असणार आहे, त्यामुळे सर्व पशुपालकांना पशुधनाचे युनिक इअर टॅगिंग करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Animal Ear Tagging
Livestock Development : पशूधन विकासासाठी स्वयंसहायता गटांचे कार्य

जिल्ह्यात पशुपालकांचा आपल्या पशुधनाच्या कानाला १२ अंकी युनिक इअर टॅगिंग प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १० जानेवारीपर्यंत १६ हजार २४६ पशुधनाची व ३ हजार ३७१ पशुपालकांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे.

Animal Ear Tagging
Livestock Situation : दुष्काळात सर्वाधिक दुर्लक्षित पशुधनच!

‘भारत पशुधन ॲप’वर जनावरांच्या मालकी हस्तांतरणाची नोंदणी ७ हजार ६३४, नोंदीत केलेले बदल ३ हजार ६९१, पशुपालकांच्या नावात केलेले बदल ९५८ इतके कामकाज करण्यात आले आहे.

पशुधनास वेळीच टॅगिंग होण्यासाठी अतिरिक्त १ लाख ४२ हजार इतका टॅगचा पुरवठा पशुवैद्यकीय दवाखान्यांना करून देण्यात आलेला आहे. तरी अद्यापही पशुधनाचे टॅगिंग अथवा ॲपवर नोंदणी केलेली नाही अशा पशुपालकांनी त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com