Grape Pruning
Grape Pruning  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Season : सांगलीतील द्राक्ष खरड छाटणी अंतिम टप्प्यात

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि फाद्यांची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी द्राक्षाची खरड छाटणी केली जाते. खरड छाटणीसाठी परराज्यातून सुमारे २० हजार मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यंदा द्राक्षाची खरड छाटणी मार्चपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत ९० टक्के खरड छाटणी उरकली असून उर्वरित छाटणी लवकरच पूर्ण होईल. परंतु पाण्याचे संकट असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

सांगली जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १ लाख ३० हजार एकर इतके आहे. जत तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात तीन ते चार टक्के द्राक्ष काढणी शिल्लक आहे. हंगाम संपण्यापूर्वीच जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी खरड छाटणीचे नियोजन सुरू केले होते.

यंदा द्राक्ष खरड छाटणीसाठी स्थानिक मजुरांसह नाशिक, बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणाहून मजूर आले आहेत. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून खरड छाटणी सुरू झाली आहे. त्यामुळे यंदा खरड छाटणीसाठी परज्यातून फेब्रुवारीमध्ये मजूर दाखल झाले.

मात्र, गतवर्षी खरड छाटणी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाली होती. त्यानंतर पावसाचा खंड पडला. त्यामुळे फळ छाटणीचे नियोजन विस्कळित झाले. अनेक ठिकाणी एकाचवेळी फळ छाटणी झाल्याने एकाच वेळी द्राक्ष काढणीला सुरुवात झाली.

जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व व पश्चिम भागात तीन ते चार टक्के द्राक्षाची काढणी शिल्लक आहे. तर तासगाव, पलूस, मिरज, वाळवा, खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी या तालुक्यातील द्राक्षाची खरड छाटणी पूर्ण झाली आहे. यंदाच्या खरड छाटणीसाठी नव्या जोमाने पुढे आला असून पुन्हा नव्या उमेदीने पुढील वर्षाच्या द्राक्ष हंगामासाठी सज्ज झाला आहे.

पावसाच्या दडीमुळे पाणीपातळीत घट

गतवर्षीच्या ऐन हंगामात शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामोरे जावे लागले होते. खरड छाटनीनंतर बागेला कमी अधिक प्रमाणात पाणी द्यावे लागले. मात्र, पावसाने दडी मारल्याने पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे खरड छाटणीनंतर पाण्याच्या संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहेय

जिल्ह्यात द्राक्ष हंगाम जसजसा संपला तसतसे शेतकऱ्यांनी खरड छाटणी केली. जतच्या पूर्व व पश्चिम भागात द्राक्ष काढणी शिल्लक आहे. इतर भागातील द्राक्ष खरड छाटणी आटोपली आहे.
- संजय बरगाले, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT