Sugarcane Crushing Season Maharashtra: यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध होत आहे. कोणत्याही साखर कारखानदारांनी १५ ॲाक्टोबर रोजी कारखाने सुरू करू नयेत. तरीही ज्या साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्याची गडबड असल्यास प्रतिटन ५ हजार दर जाहीर करावा. मगच धुराडी पेटवावी अन्यथा टोकाचा संघर्ष होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे..साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो ५० रूपये आणि सी हेव्ही इथेनॉल प्रतिलिटर ७० रूपये करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रयत संघटनेचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतल्यास साखर कारखानदार व शेतकरी या दोघांनाही दिलासा मिळणार आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे..Sugarcane Season Issue: पंधरा ऑक्टोबरपूर्वी कारखाने सुरू करू नका; साखर आयुक्तांना विविध शेतकरी संघटना देणार निवेदन.गेल्या ८ वर्षांत केंद्राने साखरेचा किमान विक्री दर वाढविला नाही. दुसरीकडे खते , बी- बियाणे, कीडनाशके, मजुरी, तोडणी वाहतूक खर्चात वाढ झाली. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कुठून पैसे मिळणार? यासाठी साखरेची एमएसपी व इथेनॅाल दरवाढ करा या, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळी (कर्नाटक) येथील निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत. या आंदोलनात कर्नाटक व महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. .Sugarcane Guarantee Price: हमीभाव मिळेपर्यंत कोयता लावू देणार नाही: रयत क्रांती शेतकरी संघटना.साखर कारखाने लवकर सुरु करण्याच्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योग या दोन्हींचे मोठे नुकसान होईल. गाळप हंगाम लवकर सुरू झाल्याने रिकव्हरी व वजनात घट होण्याची शक्यता आहे. याचा फटका चालू हंगामासोबतच पुढील हंगामात फटका बसणार आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रूपये अनुदान द्यावे. इथेनॅाल उत्पादनावर बंदी घातली आहे. यामुळे या प्रकल्पांच्या कर्जावरील व्याजाचा व हप्त्याचा भार कारखान्यावर येणार आहे. यामुळे संपूर्ण वर्षभराची व्याज सवलत व हप्त्यास मुदतवाढ योजना जाहीर करावी, अशी मागण्या त्यांनी केल्या आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.