Grape Pruning : यंदा अर्ली द्राक्ष छाटण्या दीड महिना उशिरा

Grape Weed : द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सध्या द्राक्षाच्या छाटणीला सुरुवात झाली आहे.
Grape Farm
Grape FarmAgrowon
Published on
Updated on

Nashik Grape News : नाशिक जिल्ह्यात पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनात कसमादे भागातील सटाणा, देवळा, कळवण व मालेगाव तालुका आघाडीवर होता. मात्र २०१८ नंतर या भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला. परिणामी या भागातील कामकाज पूर्णपणे अस्थिर झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे एकीकडे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले. त्यातच जूनपासून सुरू होणारे छाटण्याचे कामकाज जवळपास दीड महिना उशिराने सुरू झाले आहे.

Grape Farm
अर्ली द्राक्ष हंगामाप्रारंभीच उत्पादक द्विधा मनःस्थितीत 

पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी कसमादे पट्ट्याची देशभर ओळख आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पूर्वहंगामी नियोजन करण्यात यायचे. मात्र नैसर्गिक आपत्ती, पाठोपाठ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या भागातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. मागील वर्षाच्या हंगामात शेतकऱ्यांना लाभ झाला; मात्र गेल्या तीन वर्षांतील तोटा त्यातून अनेक शेतकऱ्यांना भरूनही काढता आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अस्थिर हवामानाच्या परिस्थितीत नियोजन करावे की नाही अशा संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत. मागील तीन वर्षांत अवकाळीच्या तडाख्यात सफेद द्राक्ष वाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे अधिक जोखीम व अधिक दर हे सूत्र घेऊन काम करणारे शेतकरी आता सावध पवित्रा घेऊन कामकाज करू पाहत आहेत. त्यामुळे अतिवृष्टी व अवकाळी पावसात तग धरणाऱ्या व तडे जाण्याची समस्या कमी असलेल्या वाणांचा शोध आता शेतकरी घेत आहे.

Grape Farm
Grape Crop Management : अतिपावसामुळे द्राक्ष बागेवर काय परिणाम होतो?

शेतकऱ्यांनी स्वीकारला वाण बदल व तंत्रज्ञान

अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे सफेद द्राक्ष वाणात सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी रंगीत वाणांचा पर्याय स्वीकारला आहे. अतिवृष्टी तग धरणाऱ्या व नुकसान कळेल अशाच वाणांच्या लागवडीकडे काही शेतकऱ्यांची पसंती आहे. तर काही शेतकऱ्यांकडे सफेद वाण असल्याने त्यांनी पदरमोड करून क्रॉप कव्हर सारखे महागडे तंत्रज्ञाने स्वीकारले आहे. प्रामुख्याने थॉमसन, क्लोन, तास-ई-गणेश, सोनाका या वाणांना पर्याय देत क्रिमसन, रेडग्लोब, आरा यांसारख्या वाणांचा सध्या पर्याय स्वीकारला जात आहे.

पीकविमा महागडा आहे, शिवाय क्रॉप कव्हर अनुदानाचा लाभ मिळण्यात अडचणी आहेत. सरकारने मदतीचा हात पुढे केल्यास अर्ली हंगामातील द्राक्ष निर्यातीतून परदेशी चलन मिळण्यात मदत होईल.
- कृषिभूषण खंडेराव शेवाळे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी, भूयाणे, ता. सटाणा.
हंगाम सुरू झाला आहे. मात्र जोखीम घेऊन कामकाज कामकाज करावे लागत आहे. संकटांशी दोन हात करून पुन्हा हंगामाला शेतकरी सामोरे जात आहेत. ‘अधिक जोखीम अधिक दर’यानुसार शेतकरी द्राक्ष उत्पादन घेतो. क्रॉप कव्हरसारखे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. मात्र सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल अशी योजना आणली पाहिजे. तरच पूर्व हंगामी द्राक्ष उत्पादक उभे राहतील.
- अण्णा खैरनार, द्राक्ष उत्पादक, कोटबेल, ता. सटाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com