Rabi Farming: एल निनोमुळे यंदाचा खरीप हंगाम फार जोखमीचा ठरला. सध्या कमी पाणी, जास्त उष्णता, जमिनीतील कमी ओलावा यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे माती, पाणी आणि हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पिकाची- वाणाची निवड, लागवड कालावधी ठरवावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. .यंदाचं हवामान वेगळंरब्बी पिकांना थंड वातावरण हवे असते परंतु सध्याच्या वातावरणातील उष्णता वाढलेली आहे. राज्यातील सरासरी तापमान हे ३४ अंश सेल्सिअस असते तर मराठवाड्यातील तापमान जवळपास ३ अंशांनी जास्त आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा प्रभाव यावर्षी तुलनेने जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे..Maharashtra Grape Growers Association: नवे वाण, मातीचे आरोग्य, नव्या तंत्राचे महत्त्व झाले अधोरेखित.आगाप पेरण्या फायद्याच्यायंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी केवळ एक तृतीयांश क्षेत्रातच पेरणी करायची आहे. जसे, ४ एकर क्षेत्र असल्यास केवळ ३ एकरच पेरणी या रब्बीत करावे. तसेच रब्बीच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आगाप पेरण्या कराव्या. आगाप पेरण्या म्हणजे १५ दिवस आधी पेरण्या करण्याचा सल्ला दिला जात आहे..Rabi Season Crisis: बारामतीत खरिपासह रब्बी हंगाम धोक्यात.जेणेकरुन परतीचा पाऊस आणि गारवा पिकांना सुरुवातीच्या काळात लाभू शकेल. त्यामुळे जमिनीत वाफसा तयार झाल्यास पिकाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरु शकते. गहू हे गारव्यामध्ये उत्तम वाढते. त्यामुळे जे शेतकरी गव्हाचे पीक घेऊ इच्छितात त्यांनी आगाप पेरणी करावी.निवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांच्यामते पावसाच्या अंदाजानुसार १ ऑक्टोबरला कांद्याची होळ टाकावी. त्यामुळे परतीच्या पावसाचा फायदा कांदा उत्पादक करुन घेऊ शकतात..पिकाला खत-पाणीरब्बी पिकामध्ये यंदा खतेही फार देऊ नयेत. माफक प्रमाणातच खते द्यावीत आणि फार खर्च करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच या रब्बी हंगामाला दरवर्षीपेक्षा १ ते २ सिंचन जास्त देण्याची गरज पडू शकते..पाण्याचे नियोजनशेतकऱ्यांनी जमिनीतील ओलावा जपण्याकडे लक्ष द्यावे. सेंद्रिय आच्छादनातून जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवावे. गावकऱ्यांनी पाण्याचा ताळेबंद करावा. यामध्ये विहिरींमधील पाणी, तलाव, शेततळे यांच्यात किती पाणी साचलेले आहे हे मोजून, पाण्याचे अंदाजपत्रक तयार करावे. त्यानुसार गावकऱ्यांनी पिकांची निवड करावी आणि पाण्याचे नियोजन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू संशोधन केंद्रातील जलसंधारण तज्ज्ञ डॉ. मधुकर मोरे यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.