Manikrao Kokate  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Agriculture Assistant: राज्यातील कृषी सहायकांचे पदनाम बदलासाठी प्रस्ताव

Krushi Sahayak, Designation Change: राज्यातील १० हजारांहून अधिक कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी राज्यस्तरीय कार्यशाळेत ही माहिती दिली.

मनोज कापडे

Pune News: राज्यातील दहा हजारांहून अधिक कृषी सहायकांचे पदनाम बदलण्यासाठी कॅबिनेटसमोर लवकरच प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मात्र आपण आता कामातदेखील शिस्त आणली पाहिजे, असे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सूचित केले.

कृषी विभागाने आयोजिलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेचा समारोप गुरुवारी (ता. ९) सांयकाळी झाला. फलोत्पादनातील विशेष कार्याबद्दल प्रीती हिरळकर (गडचिरोली), नीलेश भागेश्‍वर (पालघर) व मनोजकुमार ढगे (बुलडाणा) या तीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. तर, संतोष वाळके, अमोल चोळके, जयप्रकाश लव्हाळे, यशवंत गव्हाणे, बलभीम आवटे, सुखदेव जमदाडे या उत्कृष्ट क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यशाळेत अनुभव कथन केले.

कृषिमंत्री म्हणाले, की ही शेवटची कार्यशाळा नसून यापुढेही कृषी विभागाच्या नियोजनासाठी उपक्रम राबविले जातील. मी स्वतः राज्यभर फिरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिस्त, गुणवत्ता आणि मेहनत आवडते. आमच्या नेत्यांप्रमाणे मलाही शिस्त आवडते. मात्र कृषी विभागात शिस्तीचा अभाव आहे. यापुढे कामात कुचराई करू नका. कृषी खात्याचा मानसन्मान वाढेल, असे काम आपण सामुदायिकपणे करूया.

विस्ताराचे काम कौतुकास्पद : कोकाटे

‘‘कृषी विभागात यापूर्वी सचिव, आयुक्त तसेच अनेक अधिकारीदेखील नव्हते. मात्र, आता सर्व ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ आले आहे. मी कृषी विद्यापीठांसोबतदेखील बैठका घेणार आहे. कृषी विभागाचे काम मर्यादित स्वरूपाचे नाही याची जाण मला आहे. आपण शेतकऱ्यांसाठी कायम बांधलेले असून सकाळी ११ ला कार्यालयात आला आणि पाचला निघून गेला, असे चित्र आपल्याकडे नाही.

समूह माध्यमातूनदेखील अनेक कर्मचारी, अधिकारी सतत कृषी विभागाचे विस्तार काम करीत असून ती कौतुकाची बाब आहे,’’ असे स्पष्ट करीत कृषिमंत्री म्हणाले, ‘‘आता मात्र प्रक्रियेला संधी देणाऱ्या शेतीमालाची लागवड वाढवावी लागेल. रेसिड्यू फ्री शेती, एआयचा वापर, बाजारपेठांचा अभास, उत्पादन व उत्पन्न वाढ तसेच भौगोलिक संधीनुसार पीक पद्धतीत बदल, याकडे लक्ष द्यावे लागेल. नव्या पिढीला प्रोत्साहक ठरणारे वातावरण आपल्या तयार करायचे असून, यापुढे राज्याच्या शेती निर्यातभिमुख दिशेने न्यावी लागणार आहे.

सर्वाधिक बुद्धिमत्तेचा विभाग : रस्तोगी

कार्यशाळेचा आढावा घेताना कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, ‘‘कृषी विभागासमोर अनेक कामांचे आव्हान आहे. ते कोणी व कसे करायचे, असा मुद्दा उपस्थित करण्याचे कारण नाही. कारण, लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारे २० हजारांहून अधिक कृषी पदवीधर आपल्याकडे आहेत. हे बुद्धिवान मनुष्यबळ आपल्या विभागाची संपत्ती असून राज्यात शास्त्रज्ञांसारखे बोलत प्रगत शेती करणारे प्रयोगशील शेतकरीदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आता तुम्ही चौकटीतून बाहेर पडून आव्हाने स्वीकारा.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा. समूह चर्चा, शेतीशाळा घेत चांगला सल्ला द्या. त्यामुळे तुमची विश्‍वासार्हता आणखी वाढेल.’’ तसेच कृषी विभागाला तंत्रज्ञानाचे पाठबळ दिले जाणार असून डीबीटी योजनेत सुटसुटीतपणा आणला जाईल. एआय वापरावर भर दिला जाईल, असे आश्‍वासन कृषी सचिवांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले. या वेळी डॉ. शरद लोहकरे, सुनील पाटील, दिनकर कौशिक, वर्षा जगताप, प्रीती डुबल, विजयसिंग दुबल, मयूर हांडे, पवन अग्रवाल, अनुपम कपूर, अविनाश कणसे, डॉ. सातप्पा खरबडे, भाईदास देवरे या उद्योजक व तज्ज्ञांनी कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

२८ पिकांसाठी कृती योजना आणा : शिंदे

सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर्स कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी कार्यशाळेला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. ‘‘राज्यात २८ पिकांच्या व्यवसाय विस्ताराला वाव आहे. त्यासाठी कृषी विभागाने या पिकांच्या लागवडीपासून ते विक्री निर्यातीपर्यंत मूल्यसाखळीचा अभ्यास करून कृती योजना तयार करावी. फलोत्पादन, पुष्पोत्पादन, मत्स्योद्योगाला चालना द्यावी. उत्पादनापेक्षाही उत्पन्न वाढीवर चर्चा व्हावी. पिकाची गुणवत्ता वाढली तर किंमत मिळेल व त्यानंतरच उत्पन्न वाढणार आहे,’’ असे श्री. शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT