Agriculture Department Maharashtra : 'कृषी'चे कामकाज होणार अधिक ‘स्मार्ट’

Digital Agriculture Planning : कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सूत्रे घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच स्मार्ट कामकाजाला प्राधान्य दिले आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी विभागाचे कामकाज अधिक स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षेत्रीय पातळीवरील नियोजन तसेच मालमत्तांचे नकाशे (अॅसेट मॅपिंग) यासाठी स्वतंत्र उपयोजन (ॲप) तयार करण्यात आली आहेत.

कृषी खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सूत्रे घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच स्मार्ट कामकाजाला प्राधान्य दिले आहे. दुसऱ्या बाजूला कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडून बहुतांश काम ऑनलाइन किंवा टॅबच्या माध्यमातून केले जात आहे.

कागदविरहित (पेपरलेस) कामकाजाला श्री. मांढरे यांच्याकडून प्रोत्साहन दिले जात आहे. विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी यांनी पुढाकार घेत आतापर्यंत दोन उपयोजनांची (अॅप्लिकेशन) निर्मिती केली आहे. यातील अॅसेट मॅपिंग अॅपवर गेल्या दोन महिन्यांपासून माहिती संकलित केली जात होती. यातील ९५ टक्के माहिती प्राप्तदेखील झाली आहे.

२८ उपक्रम जाणार अॅपवर

अॅप सुरू करण्यासाठी राज्यातील संगणकीय किंवा ऑनलाइन कामाच्या माध्यमातून सेवा जलद होतात व पारदर्शकता येत असल्यामुळे प्रशासनातील नवनियुक्त अधिकारी वर्ग या घडामोडींचे स्वागत करतो आहे. शेतकऱ्यांसाठी राज्यभर प्रशिक्षणे तसेच विविध योजनांची उद्दिष्टे यासाठी क्षेत्रीय नियोजन केले जाते. परंतु नियोजनानुसार नेमके काम केले की नाही याची अद्ययावत माहिती कधीही उपलब्ध नसते. काही वेळा खोटी माहितीदेखील पाठवली जाते. त्याची पडताळणी करणारी प्रणालीदेखील सध्या उपलब्ध नाही.

Agriculture Department
WhatApp Agriculture Channel : शेतकऱ्यांसाठी ‘व्हॉट्सॲप संवाद’; कृषी विभागाचा डिजिटल उपक्रम

परंतु आता क्षेत्रिय पातळीवरील आराखडा अॅपवर आणला जाणार आहे. क्षेत्रिय पातळीवर शेतकऱ्यांसाठी २८ उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याचे सर्व नियोजन अॅपमधून केले जाईल. एप्रिलअखेरीस ही उपयोजन चालू होताच आराखडे भरले जातील.

क्षेत्रीय पातळीवर आपण नेमके काय काम करणार आणि काय केले, याची माहिती जिओ टॅग केलेल्या छायाचित्रासह कृषी सहायकाला भरावी लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाची बिनचूक नोंद होईल तसेच काम न केल्यास कर्मचारी व अधिकारी यांच्यात होणारे अकारण वाददेखील थांबतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Agriculture Department
Agriculture Mechanization : शेतीत यांत्रिकीकरणाचा उपयोग करून उत्पादन खर्च कमी करावा

कार्यालयांची स्थिती समजणार

राज्यात कृषी विभागाची छोटीमोठी १४०० पेक्षा अधिक प्रशासकीय ठिकाणे आहेत. यात मंडळ कृषी कार्यालयांपासून ते रोपवाटिकांचा समावेश होतो. याशिवाय बीजगुणन केंद्रे, प्रयोगशाळा अशा अनेक मालमत्ता असून त्या नेमक्या कोणत्या स्थितीत आहेत, याची अद्ययावत माहिती सध्या कृषी आयुक्तालयाकडे नाही. या मालमत्ता किंवा कार्यालयांमधील अभिलेखांचे सुसूत्रीकरण, कर नियोजन, नागरिकांसाठी सुविधा किंवा कर्मचाऱ्यांकरिता प्रशासकीय साधनसामग्रीची स्थिती अशी कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही.

कृषी विभागाच्या नव्या अॅपमध्ये या कार्यालयांमधील ६० बाबींची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. अॅपमध्ये ‘जिओ टॅग’ केलेली छायाचित्रे पाठविणे बंधनकारक करण्यात आली आहेत. उदाहणार्थ, कृषी कार्यालयात माहिती अधिकाराचा फलक लावल्यानंतर त्याचे छायाचित्र जीओ टॅगिंग करीत पाठवले जाणार आहे. उपलब्ध संगणक, प्रिंटर, प्रसाधनगृहे, पेयजलाची सुविधा याचीही माहिती अॅपमध्ये साठवली जाणार आहे. त्यामुळे कृषी विभागात संगणक खरेदीची वेळ येताच नेमके किती संगणक लागतील याचा बिनचूक डाटा हाताशी राहणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचा मोठा आधार आहे. त्यामुळे बदलत्या काळाची पावले ओळखून कामकाज आणि सुविधांमध्ये आधुनिकीकरण करण्याकडे सध्या कृषी विभाग विशेष लक्ष देतो आहे. कृषी विकासाची उद्दिष्ट्ये समोर असतानाच त्यासाठी अत्यावश्यक कामाचे नियोजन, साधनसामग्रीचा व मिळकतींचा सुयोग्य वापर महत्त्वाचा ठरतो. त्यासाठीच आम्ही असेट मॅपिंग केले आहे.
- सूरज मांढरे, कृषी आयुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com