Diwali Polution Agrowon
ॲग्रो विशेष

Pollution Update : जळगावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तीन ठिकाणी प्रदूषण मोजणी केंद्रे

Diwali Festival : दिवाळीत फटाक्यांमुळे वायूप्रदूषण होते. फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना श्‍वसनाचे विकार होतात. वृद्ध, लहान मुलांना फटाक्यांचा आवाज सहन होत नाही.

Team Agrowon

Jalgaon News : दिवाळीत फटाक्यांमुळे वायूप्रदूषण होते. फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना श्‍वसनाचे विकार होतात. वृद्ध, लहान मुलांना फटाक्यांचा आवाज सहन होत नाही. यामुळे त्यांना कर्णबधीरपणा येऊ शकतो. फटाक्यांमुळे हवेचे, आवाजाचे प्रदूषण होते.

ते रोखण्यासाठी पर्यावरणपूरक फटाके फोडण्याचे आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे. शहरातील वायू व ध्वनीची मोजणी सुरू आहे. तीन ठिकाणी धूर व वायूमोजणी केंद्रे सुरू आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण अधिकारी करणसिंग राजपूत यांनी दिली.

एमआयडीसी परिसर, गिरणा पाण्याची टाकी, जुने बी. जे. मार्केट येथे हे केंद्रे असतील. या केंद्रावर दिवाळीत वायू व ध्वनीचे प्रदूषण मोजले जाणार आहे. या केंद्रांवर अधिक प्रदूषण होत असल्याचे लक्षात आल्यास त्वरित महापालिकेला जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या अधिकाऱ्यांना त्या एरियाचे नाव सांगून तेथे प्रदूषण होणार नाही.

याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या जातील. नागरिकांनीही पर्यावरणपूरक फटाके मोकळ्या जागेत फोडावेत. अपार्टमेंट, मोठ्या हाॅलच्या ठिकाणी फटाके फोडल्यास प्रदूषण होऊन वृद्ध, बालकांना त्रास अधिक होईल. नागरिकांची काळजी घेतल्यास सर्वांचाच त्रास वाचेल. ध्वनी व वायू प्रदूषणामुळे होणारे संभाव्य धोके टळतील, असे विभागाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जळगाव येथे सतत हवा गुणवत्ता देखरेख केंद्र स्थापित केले आहे. नियमित हवेची तपासणी होते. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे प्रदूषण नियंत्रणाच्या मोहिमेत भाग घ्यावा.
- करणसिंग राजपूत, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo 8th Installment : नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्यासाठी निधी मंजूर; शासन निर्णय जारी

MRGS Scheme: ‘एमआरजीएस’ योजनेत पाच कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह

Freedom Of Religion Bill: धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ विधानसभेत सादर; मुस्लिम समाज लक्ष्य असल्याचा विरोधकांचा दावा

Sugar Factory Action: सोलापूर जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांवर जप्तीचा प्रस्ताव

Millet Farming: कुरुलमध्ये राळा, वरई, भगरीचा प्रयोग,संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून पाहणी

SCROLL FOR NEXT