Pune News: राज्यासह पुणे जिल्ह्यात रविवारपासून परतीच्या पावसास सुरुवात झाली आहे. सोमवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ५५ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. यामध्ये बारामती तालुक्यातील अनेक मंडलांचा समावेश आहे. जोरदार पावसामुळे पुन्हा धरणात आवक वाढली असून, खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे..दौंड, बारामती, पुरंदर, शिरूर या भागांत पावसाचे प्रमाण अधिक असून पश्चिम पट्ट्यातील तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात चांगलेच पाणी साचले असून पुढील काही दिवस पाऊस कायम राहिल्यास नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे..Pune Heavy Rainfall: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद.हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी पाण्यामध्ये १०० ते १५० लोक अडकल्याची प्राथमिक माहिती पोलिस नियंत्रण कक्ष पीआय श्री. अंबिके यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासन व आपदा मित्र यांच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आले..Heavy Rainfall Pune: पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस.तत्काळ पीएमआरडीएच्या पीएमआरएफ रेस्क्यू टीमला कळवण्यात आल्यानंतर पीएमआरडीए जवान यांनी घटनास्थळी पोचून रेस्क्यू सुरू केले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली. एनडीआरएफ टीमला मदतीसाठी कळविण्यात आले असून घटनास्थळी दाखल झाली..साधारण तळमजल्यावर राहणाऱ्या ५०-५५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. काही नागरिक टेरेसवर सुखरूप थांबले होते. या घटनेमध्ये ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने प्रवाह थांबल्यामुळे पाणी साचले गेले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली..Pune Rainfall: मावळात सर्वाधिक २०९ टक्के पाऊस.इंदापुरात १२० कुटुंबांच्या घरात शिरले पाणीइंदापूर येथील १२० कुटुंबांच्या घरामध्ये ओढ्याचे पाणी शिरल्याने अंदाजे ४८० व्यक्तींना छत्रपती हायस्कूल सणसर येथे स्थलांतर केले आहे. सद्यःस्थितीमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे..खडकवासलातून विसर्ग सुरूखडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १०६११ क्युसेक वाढवून सकाळी दहा वाजता १४५४७ क्युसेक करण्यात आला होता..६५ मिमीपेक्षा जास्त मंडलांत पडलेला पाऊस (मिलिमीटर)हवेली : पुणे शहर, केशवनगर, कोथरूड, खडकवासला ६६.५, थेऊर १०४, उरळी कांचन १४२, भोसरी ७६, कळस ८४, वाघोली, अष्टापूर ११०, थेरगाव ६६खेड : आळंदी ७६, शिरूर : वडगाव, न्हावरा ७०, तळेगाव ९९, कोरेगाव ११०, शिरूर ७१, निमोणे ७०, बारामती : बारामती १०५, माळेगाव, पणदरे, वडगाव ९९, लोणी ७९, सुपा, मोरगाव ७३, उंडवडी, शिर्सुफळ ७०, भिगवण ७४, इंदापूर १०२, लोणी ७७, बावडा, काटी ८२, निमगाव ६७,.अंथुर्णे ७४, सणसर १०५, पळसदेव ७७, लाखेवाडी ८२, दौंड : देऊळगाव ७९, यवत १२३ केडगाव १०१, राहू ९५, रावणगाव ७०, दौंड ६८, बोरी भडक १२८, खामगाव १०५, वडगाव बांडे ९९, पारगाव ७०, बोरी पारधी १२३, गिरिम ६८, कुरकुंभ ७०, पुरंदर : जेजुरी ८५, परींचे ९८, राजेवाडी १२८, वाल्हा ८५, शिवरी ७५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.