Pune News: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापतिंच्या मानधनात आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. मात्र ही वाढ करताना बाजार समित्यांच्या उत्पन्नाने निकष ठेवण्यात आले आहेत. .पणन संचालकांच्या नव्या निर्णयानुसार, आता बाजार समित्यांच्या उत्पन्नानुसार सर्वाधिक २५ हजार आणि सर्वांत कमी ५ हजार रुपयांची वाढ केली आहे. तर या अगोदर हे मानधन १० हजार आणि १ हजार २५० एवढे होते. या बाबतची माहिती पणन संचालक विकास रसाळ यांनी दिली..Pune APMC: बाजार समितीवर आकसापोटी आरोप: सभापती जगताप.श्री. रसाळ म्हणाले, ‘‘बाजार समिती संघाच्या वतीने सातत्याने सभापती आणि उपसभापतिंच्या मानधनाची मागणी केली जात होती. २०१९ च्या निर्णयानुसार सर्वाधिक मानधन १० हजार रुपये तर सर्वांत कमी १ हजार २५० रुपये एवढे होते. मात्र आता हे मानधन २५ हजार आणि ५ हजार रुपये करण्यात आले आहे. मानधनाच्या रकमेमध्ये बाजार समित्यांच्या उत्पन्नाची अट ठेवण्यात आली आहे.’’.Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध .उत्पन्नाच्या अटीनुसार २५ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या सभापतींना २५ हजार तर उपसभापतींना १२ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर त्याखालोखाल १० कोटी ते २५ कोटी उत्पन्न असणाऱ्या समिती सभापतींना २२ हजार आणि उपसभापतींना ११ हजार मानधन मिळणार आहे..बाजार समिती उत्पन्नानुसार मिळणारे मानधनउत्पन्नाची मर्यादा सभापती उपसभापती२५ कोटींपेक्षा अधिक २५ हजार १२ हजार ५००१० ते २५ कोटी २२ हजार ११ हजार५ ते १० कोटी १९ हजार ९ हजार ५००२.५ ते ५ कोटी १६ हजार ८ हजार१ ते २.५ कोटी १३ हजार ६ हजार ५००५० लाख ते १ कोटी १० हजार ५ हजार२५ ते ५० लाख ७ हजार ५०० ३ हजार ७५०२५ लाखांपेक्षा कमी ५ हजार २ हजार ५००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.