Nashik News: ‘‘राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी संकटात आहे. यंदा शेतीवर गंभीर परिणाम झाले आहेत. अशा परिस्थितीत मार्ग काढण्याची जबाबदारी ही राज्य व केंद्र सरकारची असते. मात्र आजचे राज्यकर्ते या प्रश्नाकडे बघायला तयार नाहीत,’’ अशा कठोर शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तातडीने लक्ष घातले नाही तर, हा मोर्चा उग्र रूप धारण करेल, असा इशाराही त्यांनी दिला..‘राष्ट्रवादी’च्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोमवारी (ता.१५) नाशिक येथील गोल्फ क्लबपासून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, फौजिया खान, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार सुप्रिया सुळे, भास्कर भगरे, नीलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, अमर काळे, बाळ्या मामा म्हात्रे, आमदार रोहित शिंदे, अभिजित पाटील, नारायण पाटील, माजी आमदार सुनील भुसारा, बापू पठारे, दीपिका चव्हाण, दत्तात्रय पाटील, गोकुळ पिंगळे आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग.शेतकरी कर्जमाफी, कांदादराचा प्रश्न, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट व फसवणूक, शेतीमालाला हमीभाव व भावांतर योजना, नैसर्गिक आपत्तीचे तत्काळ पंचनामे व वाढीव दराने मदत अशा विविध मुद्द्यांवर मोर्चात आवाज उठवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..श्री. पवार म्हणाले, की शेती प्रश्नांमुळे राज्यात गेल्या दोन महिन्यांत २०००पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील आहेत. अशा परिस्थितीत आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे दुखणे समजत नाही. देवाभाऊ तुम्ही राज्यात छत्रपती शिवरायांचे दर्शन घेताना मोठे होर्डिंग व पोस्टर लावली. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही छत्रपतीप्रमाणे काम करणार आहात का? तुम्हाला शेतीप्रश्न विचारात घ्यावेच लागतील. बळीराजा उपाशी राहिला तर देश उद्ध्वस्त होईल त्यामुळे हे प्रश्न गांभीर्याने घ्या. कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नाशिकमध्ये ही सुरुवात झाली आहे, जर शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही तर हा मोर्चा उग्र स्वरूप घेईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला..Sharad Pawar on Fadanvis: देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांची टीका; जनआक्रोश मोर्चात कर्जमाफीची मागणी.‘‘राज्यात ओला दुष्काळ असल्याने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा,’’ अशी मागणी श्री. टोपे यांनी केली. तर, जयंत पाटील म्हणाले, की शेतकऱ्याला फसवू नका. सातबारा कोरा करा. त्यानुसार कर्जमाफी दोन महिन्यांत करा. तसेच ‘जर सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न विचारात घेतले नाही तर हे सरकार घालवल्याशिवाय राहणार नाही,’’ असा आरोप श्री. देशमुख यांनी केला..‘ही तर संघर्षाची सुरुवात’‘‘राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे, तो कर्जमाफी मागतो आहे. त्यामुळे राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन द्या, एक महिन्यात जर मागणी पूर्ण केली नाही तर सरकारला फिरू देणार नाही. ही संघर्षाची सुरुवात आहे. आम्ही खासदार चौकशीची मागणी दिल्लीत करणार आहोत. एक महिन्याच्या आत या प्रश्नाकडे लक्ष द्या अन्यथा मंत्र्यांना फिरून देणार नाही,’’ असा इशारा खासदार सुळे यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.