Vegetable Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Residue Free Vegetable : मुलांनी परसबागेतून फुलविल्या विषमुक्त पालेभाज्या

Vegetable Cultivation : रानमसले (ता. उ.सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत अनोखा उपक्रम राबविण्यात आला, यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच परसबाग फुलवली आहे.

Team Agrowon

Solapur News : रानमसले (ता. उ.सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत अनोखा उपक्रम राबविण्यात आला, यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच परसबाग फुलवली आहे.

या परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खिचडीसाठी लागणाऱ्या भाजीपाला उपलब्ध करून एक अनोखा उपक्रम राबविला आहे. विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होत असल्याने त्याची चवही न्यारीच आहे.

मेथी, चुका, पालक, कोथिंबीर, शेपू, टोमॅटो, वांगी, शेवगा, हादगा, भोपळा, कढीपत्ता, मिरची इत्यादी भाज्या परसबागेत फुलविल्या आहेत. विशेष म्हणजे त्या भाजीपाल्याला कुठलेही रासायनिक खत न टाकता पिकवल्या आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांना विषमुक्त भाज्या आहारात मिळू लागल्या आहेत. याचा उपयोग जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीतील मुलांनाही होत आहे.

जिल्हा परिषद शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे आम्ही परसबाग करण्याचे ठरवले आणि याच विद्यार्थी व शिक्षकांनी सहकार्य केले. यामुळेच विद्यार्थ्यांना विषमुक्त पालेभाज्या उपलब्ध झाले आहेत.
- प्रतिभा पाटील, मुख्याध्यापिका, जि. प. शाळा, रानमसले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT