Team Agrowon
परदेशामध्ये अनेक भाजीपाला पिकामध्ये कलम तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. हे तंत्रज्ञान आपल्याकडेही वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीला रूटस्टॉकसाठी गावठी किंवा जंगली रोपाची निवड केली जाते, तर सायन म्हणून संकरित वाणाची निवड केली जाते.
हे संकरित वाण शेतकऱ्याने निवडलेले घेतले जाते. एकदा रुटस्टॉक आणि सायनची निवड झाली की कलम बांधण्याची पद्धत निवडली जाते.
व्यापारी तत्त्वावरील कलमांसाठी क्लेफ्ट कलम, टॉप इन्सर्शन कलम, भेट कलम व पाचर कलम या विविध कलम पद्धतींचा उपयोग केला जातो.
कलम केलेली रोपे मातीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगांना प्रतिकारक्षम असतात.
कलम केलेले रोप मातीतून येणाऱ्या सूत्रकृमींना बळी पडत नाही. रोपांमध्ये जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता जास्त असते.
कलम केलेल्या रोपांमध्ये पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ होते. मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो.
कलम केलेल्या भाजीपाला पिकासाठी खत, पाणी कमी लागते.
कलम केलेल्या भाजीपाला पिकांचा फळांचा आकार, उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते, गुणवत्ता सुधारते. उत्पादन कालावधी कमीत कमी ३५ दिवस आणि जास्तीत जास्त ६० दिवसांपर्यंत वाढतो.