Kharif Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : बदलत्या वातावरणामुळे खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव

Kharif Crop : सध्या दिवसभर कडक ऊन्ह, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि पहाटे पडणारे धुके अशा बदलत्या हवामानामुळे अनेक पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Pune News : सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांवर काही ठिकाणी रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिके वाचविण्यासाठी राजेगाव शिवारात शेतकऱ्यांची धडपड चालू आहे.

सध्या दिवसभर कडक ऊन्ह, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि पहाटे पडणारे धुके अशा बदलत्या हवामानामुळे अनेक पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, कपाशी आदी पिकांचा समावेश आहे. प्रामुख्याने हुमणी, गुलाबी बोंड अळी, लष्करी अळी आदींचा प्रादुर्भाव झालेला आहे.

ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने शेती व फळपिकांचे क्षेत्र बाधित झालेले आहे. पुणे जिल्ह्यात सोयाबीन लागवडीत हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पिकावर तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट अळी, खोडमाशी, चक्रीभुंगा तसेच कापूस पिकावर गुलाबी बोंड अळी, मावा, तुडतुडे; तर भात पिकावर पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे, खोडकिडी यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

मूग, उडीद पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा, तर मका व बाजरी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांची कीडनाशके फवारणीची धडपड सुरू आहे.

सध्या बहुतांश भागातील कपाशी पीक पात्या व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. हवामान बदलामुळे तसेच बी. टी. कपाशीला प्रतिकारक्षम बनल्यामुळे गुलाबी बोंड अळीचा धोका वाढला आहे. प्रादुर्भाव वाढला व प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेले तर व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
- शीतल मगर, कृषी पर्यवेक्षक दौंड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

Forest Fire: वनी वणवा पिसाटला

Maharashtra Politics: दानवेंच्या उमेदवारीवरून धुसफूस

SCROLL FOR NEXT