Climate Change
Climate ChangeAgrowon

Climate Change : तापमान वाढीवर वृक्षारोपण हाच उपाय

Tree Plantation : लावलेले प्रत्येक झाड कार्बन शोषून घेत असल्याने तापमान वाढीवर वृक्षारोपण हाच उपाय आहे, असे मत निवृत्त पणन संचालक सुनील पवार यांनी व्यक्त केले.
Published on

Pune News : वृक्ष लावून जबाबदारी न झटकता लावलेल्या झाडांचे संगोपन केले पाहिजे. वातावरणात तापमानाचे धोके वाढल्याने त्याचे परिणाम सध्या दिसून येत आहेत. लावलेले प्रत्येक झाड कार्बन शोषून घेत असल्याने तापमान वाढीवर वृक्षारोपण हाच उपाय आहे, असे मत निवृत्त पणन संचालक सुनील पवार यांनी व्यक्त केले.

राज्याच्या ३४ जिल्ह्यांतील ३ हजार ४०० गावांमध्ये ३५ लाख वृक्षलागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने वासुली (ता. खेड) येथील भामचंद्रनगर येथे वृक्षरोपे वितरण आणि वृक्षारोपण महायज्ञ कार्यक्रम पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

Climate Change
Climate Change : हवामान बदलाच्या युगात उत्तम बीजारोपण आवश्यकच

याप्रसंगी राष्ट्रीय सरपंच संसदेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, सहायक वन संरक्षक प्रज्योत पालवे, जयश्री जगताप, खेड वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, प्रकाश महाले, सुनीता शिवेकर, विकास जाधव, कालिदास वाडेकर, जिल्हा संघटक रत्ना पिंगळे, सोमनाथ शिंदे, उज्ज्वला शेवाळे, वर्षा शिवले, अनिता खरात, सरपंच पुजा बुट्टेपाटील आदी उपस्थित होते.

Climate Change
Climate Change : देशातील ८५ टक्के जिल्हे ‘रेडझोन’मध्ये

या वेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करून या महायज्ञाची सुरुवात झाली. प्रज्योत पालवे यांनी ‘वृक्षारोपण-काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले. वृक्षारोपण महायज्ञ कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन योगेश पाटील केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते लोकप्रतिनिधींना वृक्षरोपे वितरित करण्यात आली त्यानंतर भामचंद्रनगर येथे सामुदायिक वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रीय सरपंच संसदेच्या पुणे जिल्हा महिला संघटक रत्ना पिंगळे प्रमुख संयोजक होत्या. सचिन नाईकडे, अक्षय शिवेकर, दीपक कालेकर, सुनीता शिवेकर, योगिनी जगनाडे, निकीता गावडे, ज्योती कडलग यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. प्रास्ताविक रत्ना पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन विकास जांभूळकर यांनी केले. आभार सुनीता शिवेकर यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com