Areca Nut Shoes  Agrowon
ॲग्रो विशेष

Areca Nut : सुपारीच्या विरीपासून बनविलेल्या चपलांना पेटंट

Areca Nut By Product : सिंधुदुर्गात सुपारीची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. मागील काही वर्षांत सुपारीच्या पानांपासून पत्रावळी, द्रोण, चमचे यांसह विविध वस्तू बनविल्या जातात.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यातील तळकट (ता. दोडामार्ग) श्‍वेता श्रीनिवास बर्वे या तरुणीने सुपारीच्या विरी (पौली)पासून बनविलेल्या पर्यावरणपूरक चपलांनाला पेटंट मिळाले आहे. तिच्या कौशल्याचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी कौतुक केले आहे.

सिंधुदुर्गात सुपारीची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. मागील काही वर्षांत सुपारीच्या पानांपासून पत्रावळी, द्रोण, चमचे यांसह विविध वस्तू बनविल्या जातात. परंतु तळकट येथील श्‍वेता बर्वे या तरुणीने सुपारीच्या विरीपासून चपला बनविल्या आहेत.

या चपलांना पेटंट मिळावे यासाठी तिचे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. तिने कौशल्यातून बनविलेल्या या चपलांना तिच्या नावाने पेटंट मिळाले आहे. ही पर्यावरणपूरक चप्पल आकर्षक आहे. ही चप्पल बनविण्यापूर्वी तिने यासंदर्भातील प्रशिक्षण घेतले होते.

लवकरच श्‍वेता या चप्पल बनविण्याचा व्यवसाय तळकट येथे सुरू करणार आहेत. त्यामुळे वाया जाणाऱ्या सुपारीच्या विरीला देखील किंमत मिळणार आहे.

प्रति विरी दोन रुपये दराने त्या खरेदी करणार आहेत. चप्पल बनविण्यासाठी आवश्यक मशिन खरेदीची प्रकिया सुरू असून, येत्या काही महिन्यांत हा व्यवसाय त्या सुरू करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT