Sugar Factory Crushing Season 2026: केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडत असून, उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. चालू गळीत हंगाम १५ ऑक्टोबरऐवजी १ नोव्हेंबरनंतर सुरू करावा, अशी मागणी इंडियन इरिगेशन फेडरेशनने केली आहे..साखर उद्योगातील अडचणींचा फटका ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार आणि कामगार या तिन्ही घटकांना बसत आहे. १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू केल्यास उसाच्या रिकव्हरीमध्ये घट होऊन शेतकरी व कारखान्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे..Sugarcane Crushing Season: यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून, सरकारचा निर्णय, पण साखर उतारा घटणार?.त्यामुळे कारखान्यांनी शासनाच्या दबावाला बळी पडून लवकर गाळप सुरू करू नये, असे आवाहन फेडरेशनने केले आहे. साखरेचा किमान हमीभाव प्रति किलो ५५ रुपये आणि सी-हेवी इथेनॉलचा दर प्रति लिटर ७० रुपये निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे..Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगाम लवकर सुरू केल्यास टोकाचा संघर्ष : राजू शेट्टी .१५ ऑक्टोबरला कारखाने सुरू करणे बंधनकारक असल्यास केंद्र व राज्य शासनाने प्रति टन ५०० रुपये अनुदान द्यावे, अशीही मागणी आहे. इथेनॉल उत्पादनावरील निर्बंधांमुळे कारखान्यांवर कर्जाचा व्याज व हप्त्यांचा भार वाढणार असल्याने वर्षभराची व्याजसवलत आणि कर्जहप्त्यांना मुदतवाढ द्यावी. तसेच आयात होणाऱ्या इथेनॉल व एसडीएसवर आयात शुल्क आकारावे, अशी मागणी फेडरेशनने केली आहे..या मागण्यांबाबत पंतप्रधान कार्यालय तसेच मुख्यमंत्री यांना पत्र पाठविण्यात आले आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा फेडरेशनने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.