Areca Nut : सुपारीतून अर्थव्यवस्‍थेला गती

Areca Nut Market : सुपारी पीक व्यापारी तत्त्वावर घेतले जाते. या पिकास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दिवेआगार येथे २ हेक्टर जमिनीवर विस्तारित केंद्रास सोमवारी (ता. ६) मान्यता दिली.
Areca Nut
Areca NutAgrowon

Raigad News : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग तालुक्यांत सुपारी पीक व्यापारी तत्त्वावर घेतले जाते. या पिकास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने दिवेआगार येथे २ हेक्टर जमिनीवर विस्तारित केंद्रास सोमवारी (ता. ६) मान्यता दिली असून ५ कोटी ६४ लाखांच्या खर्चाची तरतूद केली आहे.

जिल्ह्यात सुपारीमुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असून त्‍यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. या पिकासोबत नारळ, केळी, जाम तसेच जायफळासारखी मसाला पिके घेतली जातात. दिवेआगर येथे सुपारी संशोधन प्रकल्प झाल्यास आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व बागायतदारांना कृषी तंत्रज्ञान मिळवण्यासाठी; तसेच कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

Areca Nut
Areca Nut : सुपारी बागायतदार फळगळीमुळे संकटात

यासाठी श्रीवर्धनच्या आमदार व महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी पाठपुरावा केला होता. दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारण्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने ९ ऑगस्टला प्रसिद्ध केले होते. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याबरोबर तटकरे यांची मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत पाच कोटी ६४ लाख रुपयांना मंजूर करण्यात आले.

Areca Nut
Advance Payment : नोव्हेंबरचे अर्धे मानधन मिळणार अग्रिम स्वरूपात

बीजातून रोप तयार होण्यास वर्षभराचा काळ

रोठा सुपारीची बी पेरल्यापासून रोप तयार होईपर्यंतच वर्षभराचा काळ जातो. त्यानंतर पुढे चार-पाच वर्षांनीच उत्पन्न सुरू होते, जे पुढे ३०-३५ वर्षे मिळते. २०२० मध्ये आलेल्‍या चक्रीवादळात अलिबागपासून दापोलीपर्यंत ३४३ हेक्‍टर क्षेत्रातील सुपारीच्या बागांचे मोठे नुकसान झाले होते. इतकेच नव्हे तर संशोधन केंद्रातील रोपवाटिकेतील जवळपास ८५ टक्‍के झाडे नष्‍ट झाली होती.

प्रमुख उद्दिष्ट्ये

सुपारीवर संशोधन करून बुटक्या व दर्जेदार उत्पन्न देण्याच्या जाती विकसित करणे

दिवेआगरमधील हवामान विचारात घेऊन आंतरपीके विकसित करणे. शेतकऱ्यांसाठी विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करणे

दिवेआगर पंचक्रोशीतील गावांचा एकात्मिक ग्रामविकास आराखडा करून प्रात्यक्षिक घेणे

दर्जेदार कलमे व रोपवाटिका विकसित करणे

Areca Nut
Water Crisis : खानदेशात जलसाठा घटू लागला

पर्यटनवाढीस मदत

सुपारी संशोधन केंद्रामुळे येत्या काळात दिवेआगरमध्ये स्थानिक शेतकरी व बागायतदारांना आधुनिक तंत्रज्ञान मिळणार आहे. याशिवाय दिवेआगरच्या पर्यटनासाठी वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रकल्पासाठी दिवेआगर ग्रामपंचायतीकडे पाच एकर जागा वर्ग करण्यात आली आहे.

सुपारीचे नवे वाण ‘श्रीवर्धनी’

अलिबागपासून खाली तळकोकणापर्यंत नारळ आणि सुपारी हीच किनारी प्रदेशातली मुख्य नगदी पिके आहेत. त्यातही श्रीवर्धनमधील बहुतांश बागायतदार सुपारीवर अवलंबून आहेत. इथली ‘श्रीवर्धनी’ नावाची प्रजाती सर्वांत प्रसिद्ध आहे. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्‍थानिक रोठा प्रजातीपासून ती विकसित केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com