US Canada Trade Restrictions: अमेरिकेने कॅनडातून होणाऱ्या सुमारे एक अब्ज डॉलरच्या आयातीवर बंदी लागू केली असून, यामध्ये मद्य, दुग्धजन्य पदार्थांपासून मोटारसायकलींपर्यंतचा समावेश आहे. अमेरिका-कॅनडामधील द्विपक्षीय व्यापार ८८० अब्ज डॉलर असून, त्या तुलनेत हे निर्बंध मर्यादित असले तरीही यातून दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव वाढणार आहे..अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी मंदीच्या काळातील कायद्याचा आधार घेत कॅनडातून आयात होणाऱ्या सुमारे २० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर ५० टक्के शुल्क लागू केले होते. कॅनडाकडून अमेरिकी दुग्धजन्य पदार्थ, मोटारवाहने आणि मद्य उत्पादकांशी भेदभाव केला जात असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता..Trump Tariff Powers: ट्रम्प यांना मिळणार शुल्कवाढीचा अधिकार.त्याला प्रत्युत्तर म्हणून कॅनडानेही अमेरिकी वस्तूंवर १५, २५ आणि ५० टक्क्यांपर्यंत शुल्क लागू केले. या प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी कॅनडातील काही वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला..India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको.काही दुग्धजन्य पदार्थांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्यात दुधापासून तयार होणाऱ्या ‘व्हे’ या उपपदार्थाचा समावेश आहे. कॅनडाच्या दुग्ध व्यवसायाला परदेशी स्पर्धेपासून संरक्षण देण्यासाठी आयात कोटा ओलांडल्यानंतर मोठे शुल्क आकारण्याच्या धोरणावरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून मतभेद आहेत..अमेरिकेच्या बंदीमध्ये कॅनडातील क्युबेकस्थित बॉम्बार्डियर रिक्रिएशनल प्रॉडक्ट्सच्या (बीआरपी) कंपनीच्या तीन चाकी ‘कॅन-अॅम स्पायडर’ आणि ‘कॅनियन’ मोटारसायकलींचाही समावेश असल्याचे स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.