Market Committee Federation Demand: दुष्काळी २६५ तालुक्यांतील बाजार समित्यांचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे भरावयाचे अंशदान माफ करावे. तसेच बाजार समित्यांवर आकारण्यात येणारे महानगरपालिका आणि नगरपालिका करही माफ करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे प्रभारी सभापती संतोष सोमवंशी यांनी केली.