Palm Oil  Agrowon
ॲग्रो विशेष

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Market Update : जागतिक बाजारात पामतेलाच्या वाढलेल्या किमतीचा फायदा मलेशियाला चांगला आहे. इंडोनेशियाने ४० टक्के पामतेल जैवइंधनात वापरण्याचे धोरण जाहीर केले आहे.

Anil Jadhao 

Pune News : जागतिक बाजारात पामतेलाच्या वाढलेल्या किमतीचा फायदा मलेशियाला चांगला आहे. इंडोनेशियाने ४० टक्के पामतेल जैवइंधनात वापरण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे येथून निर्यात कमी झाली. परिणामी पामतेलाचे भाव सोयातेल आणि सूर्यफूल तेलाच्या भावाबरोबर स्पर्धा करत आहे, असे पामतेल बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

मुंबई येथे सुरु असलेल्या ग्लोब ऑईल काॅन्फरन्समध्ये जागतिक पाम तेलविषयक चर्चासत्रात पाम तेल बाजार विश्लेषक डाॅ. साथिया वर्का आणि मलेशियातील ग्लेनौक इकाॅनिक्सचे कार्यकारी संचालक डाॅ. जुलियन मॅक्गील यांनी ही माहिती दिली. डाॅ. वर्का म्हणाले की, मलेशिया  इंडोनेशियानंतर मलेशिया जगात दुसऱ्या क्रमांकाचा पामतेल उत्पादक देश आहे.मलेशियात पामतेलाचे उत्पादन चांगले आहे. मलेशियातील महत्वाच्या उत्पादक भागात उत्पादन वाढले आहे. मलेशियात सबाह प्रांत पामतेल उत्पादनात महत्वाचा आहे. सबाह भागात मात्र उत्पादन घटले आहे.  

मलेशियातून सर्वाधिक पामतेल निर्यात चीनला होत असते. म्हणजेच चीन महत्वाचा ग्राहक आहे. भारतही मलेशियाच्या पामतेलाचा महत्वाचा ग्राहक आहे. पण सध्या चीनला मलेशियातून होणारी पामतेलाची निर्यात कमी झाली आहे. तर आशियातील देशांना निर्यात वाढली आहे. भारतालाही निर्यात वाढली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्टमध्ये निर्यात काहीशी वाढलेली दिसते, असेही वर्का यांनी स्पष्ट केले.

डाॅ. मॅक्गील म्हणाले की, पामतेलाचे भाव २०२२ मध्ये विक्रमी पातळीवर पोचले होते. त्यासाठी अर्जेंटीनामधील दुष्काळ, इंडोनेशियाने निर्यातीवर घातलेली बंधने आणि रशिया-युक्रेन युध्दामुळे पामतेलाचे भाव वाढले होते. पामतेलाच्या वायद्यांमध्ये २०२४ मध्ये आतापर्यंत भावात चढ उतार दिसून आले. पण किमती मागील वर्षीच्या तुलनेत केवळ ३ टक्के जास्त किंमत होती. पामतेल उत्पादन घटत असल्याचा आणि इंडोनेशियात वापर वाढल्याचा हा परिणाम आहे. पण सोयाबीन उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त होते. त्याचा परिणाम पामतेलाच्या किमतीवरही होत आहे. असे असले तरी गेल्या वर्षभरात खूप कमी वेळा पामतेलाचा भाव सोयातेलापेक्षा कमी राहीला. 

 इंडोनेशियात पामतेल उत्पादन कमी होत असले तरी मलेशियात उत्पादनात काहिशी सुधारणा दिसून आली. पामतेलाची किंमत सोयातेलाच्या किमतीबरोबर आहे. निर्यात चांगली सुरु आहे पण चीनला निर्यात कमी आहे. मलेशियाचे चलन असलेले रिंगीट मजबूत होत आहे. मलेशियातून निर्यातही सुरु आहे. इंडोनेशियात बायोडिझेलसाठी पामतेलाचा वापर वाढला. जानेवारी ते मे दरम्यान पामतेल सोयातेलापेक्षा महाग होते. त्यानंतर मेपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत पुन्हा महाग झाले होते. आता पुन्हा स्वस्त झाले. 

मलेशियाची निर्यात यंदा वाढली. याला प्रामुख्याने दोन कारणे आहेत. इंडोनेशियाने जैवइंधनासाठी बी ४० धोरण राबवले आहे. त्यामुळे निर्यातीवर परिणाम होत आहे. युरोपियन युनियनच्या युईआर पाॅलिसीमुळे युरोपियन युनियनमध्ये पामतेलाची आयात कमी झाली. तर सूर्यफुल तेलाची आयात वाढत आहे. २०२५ मध्ये युरोपियन देशांमध्ये पामेलाची आयात कमी होऊन सूर्यफुलाची आयात वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे सूर्यफुल तेलाला आधार मिळू शकतो. 
डाॅ. जुलियन मॅक्गील, कार्यकारी संचालक, ग्लेनौक इकाॅनिक्स, मलेशिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT