Palm Oil Production : इंडोनेशियातील पामतेल उत्पादन वाढणार

मागील वर्षापासून खाद्यतेल बाजारात मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. इंडोनेशियातील पामतेल उत्पादन घटून निर्यातीवर बंधनं आली होती.
Palm Oil
Palm OilAgrowon

बाली, इंडोनेशियाः मागील वर्षापासून खाद्यतेल बाजारात (Edible Oil Market) मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. इंडोनेशियातील पामतेल उत्पादन (Palm Oil Production) घटून निर्यातीवर बंधनं आली होती. त्याचा फटका आयातदार देशांना बदला होता. मात्र यंदा इंडोनेशियातील पामतेल उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे.

Palm Oil
Palm Oil Export : इंडोनेशिया वाढविणार पाम तेलाची निर्यात

एकूण जागतिक खाद्यतेल पुरवठ्यात पामतेलाचा वाटा जवळपास ३० टक्के आहे. म्हणजेच पामतेल बाजाराला विशेष महत्व आहे. त्यातच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युध्दाने जागतिक बाजारात सूर्यफुल तेलाचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे ग्राहक इतर खाद्यतेलांकडे वळत आहेत. यामुळे पामतेलासह इतरही खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली होती.

Palm Oil
Palm Oil Export: पामतेल निर्यात धोरणात सातत्य राखण्याची गरज

जागतिक पातळीवर पामतेल उत्पादनात इंडोनेशिया आघाडीवर आहे. मात्र मागीलवर्षी इंडोनेशियातील पामतेल उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहीले होते. परिणामी जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी तेजी आली होती. पण यंदा येथील पामतेल उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. द इंडोनेशियन पाम ऑईल असोसिएशनचे अध्यक्ष जोको सुप्रियोनो यांनी पामतेल उत्पादन यंदा ५१८ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

पाम तेल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ या वर्षात इंडोनेशियामध्ये ५१३ लाख टन पामतेलाचे उत्पादन झाले होते. ते ५१८ लाख टनांवर पोचेल. तर सप्टेंबर महिन्यापर्यंत इंडोनेशियात ३७० लाख टन पामतेल हाती आले होते. त्यापैकी इंडोनेशियाने २२० लाख टनांची निर्यात केली आहे.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, मागील काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमधील युध्द आणि इंडोनेशियाच्या पामतेल धोरणामुळे खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली होती. यामुळे आय़ातीवर अवलंबून असलेल्या देशांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले होते.

यंदा आम्हाला ५१८ लाख टन पामतेल उत्पादनाची आशा आहे. यात ४७० लाख टन कच्चे पामतेल तर ४८ लाख टन कच्च्या पाम कार्नेल तेलाचा समावेश असेल. यंदा पामतेलाची निर्यात ३०० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे.
जोको सुप्रियोनो, अध्यक्ष, द इंडोनेशियन पाम ऑईल असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com