sandeep Shirguppe
देशातील ११ राज्यात राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत ४९ जिल्ह्यांमध्ये पाम तेल लागवडीची मोहिम राबववण्यात आली आहे.
पाम तेल लागवडीतून उत्पादन वाढवण्यासाठी पाम तेल प्रक्रिया कंपन्यांसोबत 'मेगा ऑइल पाम प्लांटेशन ड्राइव्ह' सुरु केले आहे. खाद्यतेल उत्पादनात देश 'आत्मानिर्भर' होण्यास मदत होईल.
कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ७ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी सुमारे ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ५ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात २५ जुलै २०२३ ला सुरू झाली तर १२ ऑगस्टला समारोप करण्यात आला. २०२५-२६ पर्यंत ६.५ लाख हेक्टर क्षेत्रावर पाम तेल लागवड करण्याचे उद्दीष्ट आहे.
११ राज्यांमधील ४९ जिल्ह्यांतील ७७ गावांमधील ७ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी पाच लाखाहून अधिक पाम तेलाच्या वृक्षाची लागवड केल्याची माहिती देण्यात आली.
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, कर्नाटक, मिझोराम, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा या प्रमुख पाम तेल उत्पादक राज्यांमध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्ष लागवडीच्या संदर्भात वेळोवेळी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना अधिक जागरूक करणे, वृक्षांचे आरोग्य सुधारणे हे उद्दीष्ट होते.
उत्पादकता वाढेल आणि शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. पामतेल खाद्यपदार्थ, चॉकलेट, आईसक्रीम, ब्रेड, बटर अगदी सौंदर्यप्रसाधनातही त्याचा वापर केला जातो.
डिझेल आणि पेट्रोलमध्ये त्याचा बायोइंधन म्हणून वापरतात. औद्योगिक क्षेत्रातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळं देशात पाम तेलाचं उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे.
भारतात खाद्यतेलाच्या एकूण बाजारपेठेपैकी ६० टक्के भाग पाम तेलाने व्यापला आहे. पण भारतात एकूण गरजेच्या फक्त २.७ टक्के इतकेच पाम तेलाचे उत्पादन होते.
इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधून भारतात पाम तेलाची ९० टक्के आयात करण्यात येते.