Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Replantation : सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड पूर्ण

Paddy Farming : भातरोपवाटिका तयार करण्यापासून ते पुर्नलागवडीस पोषक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : भातरोपवाटिका तयार करण्यापासून ते पुर्नलागवडीस पोषक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी ६२ हजार ५०० हेक्टरवर भातरोप पुनर्लागवड झाली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातपीक उत्पादन घेतले जाते. या वर्षी कृषी विभागाने ६३ हजार हेक्टरवर भातपीक लागवड होईल, असा अंदाज दिला होता. या वर्षी २० मेपासून मॉन्सूनपूर्व पाऊस आणि ६ जूनला मॉन्सूनचा पाऊस सुरू झाला.

त्यामुळे भातरोपवाटिका तयार करताना कोणतीही अडचण शेतकऱ्यांना आली नाही. शेतकऱ्यांना भातबियाणे आणि खतेदेखील वेळेत मिळाली. त्यामुळे जूनच्या २२ तारखेपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या भातरोपवाटिका तयार झाल्या होत्या. ६ हजार २०० हेक्टरवर भातरोपवाटिका तयार करण्यात आल्या होत्या.

या वर्षी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील भातरोप पुनर्लागवड साधारणपणे जूनच्या अखेरच्या आठवड्यात सुरू झाली. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी नियमित भातरोप पुनर्लागवडीला सुरुवात झाली.

जिल्ह्यातील ७५ टक्के पुनर्लागवड ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. परंतु या वर्षी लागवडीला प्रारंभ केल्यापासून अखंडपणे पाऊस बरसला. त्यामुळे पुनर्लागवडीत अजिबात खंड पडला नाही. काही पाणथळ जमिनीतील लागवडी मुसळधार पावसामुळे रखडल्या होत्या. परंतु भातरोप लागवड आता पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील ६२ हजार ५०० हेक्टरवर भातरोप लागवड करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT