Paddy Store Damage : धानाच्या कोठारात १७ हजार हेक्‍टर नुकसान

Rain Update : गेल्या आठवडाभरापासून भंडाऱ्यासह सर्वच जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. परिणामी त्याचा शेतीला मोठा फटका बसून १७ हजार ७२९ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे.
Paddy Damage
Paddy DamageAgrowon
Published on
Updated on

Bhandara News : गेल्या आठवडाभरापासून भंडाऱ्यासह सर्वच जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. परिणामी त्याचा शेतीला मोठा फटका बसून १७ हजार ७२९ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे.

धानाचे भंडार अशी भंडारा जिल्ह्याची ओळख. भातरोपे रोवण्यांसाठी पोषक असा पाऊस जुलैमध्ये बरसला असला तरी काही भागात नदी-नाल्यांच्या काठावर असलेल्या शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक भागात रोवणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले. जमीन खरडून गेल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला. अशा शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ येणार आहे. मात्र त्याकरिता रोपांच्या उपलब्धतेचे आव्हान असेल.

Paddy Damage
Paddy Crop Damage : नागपुर जिल्ह्यातील धानपट्ट्यात १९७६ हेक्‍टरवर नुकसान

जिल्ह्यात पुजारीटोला प्रकल्प ६९.१८ टक्‍के भरला असून त्याच्या सहा दरवाजांतून १२३ क्‍युमेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. बानवथडीची पातळी ४३.५१ टक्क्यांवर पोचली आहे. संजय सरोवर ९२.७० टक्‍के भरले आहे. दोन दरवाजातून य प्रकल्पातील ९९१ क्‍युमेक पाणी सोडले जात आहे. राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्दचे ३३ पैकी २१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून ८०४७.२६ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धापेवाडाचा विसर्ग ४५४१.२३ क्‍युसेक आहे. कारधा प्रकल्पाची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

Paddy Damage
Rain Update: आज अनेक जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

लाखांदूर तालुक्‍यात पावसामुळे जीर्ण झालेले घर पाडत असताना अचानक घराचा स्लॅब अंगावर पडला. यामध्ये प्रफुल्ल रामटेके (वय २५) या मजुराचा मृत्यू झाला. त्यासोबतच पावसाची संततधार सुरू असल्याने तब्बल २१ मार्गावरील वाहतूक बंद होती. जिल्ह्यात पुरामुळे २५ कुटुंबीयांचे स्थलांतरण करावे लागले. मोहाडी तालुक्‍यातील चीचखेडा येथे पूल वाहून गेला आहे.

३९ हजार १४१ शेतकऱ्यांचे नुकसान

प्रशासनाच्या माहिनीनूसार, सुरवातीला जिल्ह्यात केवळ ८६५ हेक्‍टरचे नुकसान होते. त्यानंतर १९ ते २१ जुलै या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे नुकसान तब्बल १७ हजार हेक्‍टरवर पोचले आहे. भंडारा तालुक्‍यात चार गावांत ३०३७ हेक्‍टर, पवनीतील १२४ गावांत १० हजार ५५४ हेक्‍टर, साकोलीच्या २ गावांत २.२ हेक्‍टर, लाखनीच्या २० गावांतील ५२.९, लाखांदूर तालुक्‍यात ८९ गावांत ७०६८ हेक्‍टर याप्रमाणे १७ हजार ७२९.६० हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com