Paddy Farming : पाणी साचल्‍याने भातशेती कुजली

Rain Update : उरण तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भातशेतीत पाणी साठल्याने भाताची रोपे कुजून गेली आहेत.
Paddy Farming
Paddy Farming Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने उरण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भातशेतीत पाणी साठल्याने भाताची रोपे कुजून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांना सतावत आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे उरण तालुक्यातील पुनाडे, सारडे, पिरकोन, वशेणी, गोवठणे, पाले, आवरे, कडापे, पानदिवे, कोप्रोली, खोपटे, कळंबुसरे, चिरनेर भोम, कंठवली, विंधणे इत्यादी ग्रामीण भागातील शेतात पाणी साचले आहे. जून महिन्यात केलेली पहिली पेरणी अतिवृष्टीमुळे वाया गेली.

Paddy Farming
Paddy Farming : दिंडोरीत भात लावणी अंतिम टप्प्यात

त्यानंतर शेतकऱ्यांनी घरी भाताची रोपे तयार करून ती शेतात लावली. त्याला ग्रामीण भागात ‘रो’ संबोधतात. या रोची दुसऱ्यांदा लावणी केलेली भाताची रोपेसुद्धा अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली. बरेच दिवस त्यांना सूर्यप्रकाश न मिळाल्याने वाढीची प्रक्रियाच मंदावून भाताची रोपे कुजून वाया गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

उरणमध्ये सलग आठवडाभर जोरदार पाऊस पडत आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी शेतात साचलेले पाणी व गाळ भातपिकावर बसल्याने रोपांना यांचा फटका बसून वाढीवर परिणाम झाला आहे.

Paddy Farming
Heavy Rain : अतिवृष्टीने रायगड, पालघर, ठाण्यातील भातशेतीचे नुकसान

दुसऱ्यांदा केलेली पेरणी, पिके कुजल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आता पुन्हा बी-बियाणांची जमवाजमव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून तिसऱ्यांदा पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आम्हाला शेतीशिवाय कोणत्याही उत्पन्नाचे साधन नाही. शेतीवर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे आमच्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे. शेतात पीक कुजल्याने तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आली आहे.
निकिता पाटील, शेतकरी
शेतात पीक कुजल्याने आमची मेहनत व पैसा सर्वच वाया गेले आहे. लावणीच्या वेळी जेवण, नाष्टा व ३०० ते ३५० रुपये मजुरी देऊन आम्ही पिके लावली होती. आता तिही पाण्याखाली गेल्याने आमच्या डोळ्यापुढे अंधार आहे.
विनोद पाटील, शेतकरी
उरण तालुक्यात मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शेतीच्या नुकसानाची प्राथमिक माहिती घेऊन अहवाल दिला जाईल. वरिष्ठ पातळीवरून काही आदेश आले तर कळविले जाईल.
शिवाजी लोहकर, कृषी पर्यवेक्षक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com