Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : वीसगाव खोऱ्यात भात काढणीला सुरुवात

Paddy Farming : गेल्या आठ-दहा दिवसांत पाऊस न पडल्यामुळे भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात भातपीक कापणीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Bhor News : गेल्या आठ-दहा दिवसांत पाऊस न पडल्यामुळे भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात भातपीक कापणीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. परंतु भात कापणीसाठी आवश्यक असणारा कुशल मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने भातकापणी करून घेत आहे. तसेच इर्जिक पद्धतीने एकमेकांची शेतीतील कामे केली जात आहे.

यंदा परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळीनंतर शेतकरी कापणी, झोडणी आणि मळणीच्या कामात व्यग्र झाले आहेत. एकाच वेळी भातशेती कापणीला सुरुवात झाल्याने मजुरांचा तुटवडा भासत असल्याचे जाणवत आहे. मजूर मिळत नसल्याने आणि जिथे मजूर उपलब्ध होत आहेत.

त्यांची मजुरी जास्त असल्याने कापणीस विलंब होताना पाहावयास मिळत आहे. सध्या दिवसाला ३०० ते ४०० रुपये मजुरी याशिवाय नाष्टा, दुपारचे जेवण, दोनदा चहा, पिण्यासाठी जारचे पाणी, प्रवासखर्च किंवा नेण्या-आणण्याची व्यवस्था आदींचे नियोजन करावे लागत आहे. एका दिवसाच्या कामाला मजुराअभावी दोन ते तीन दिवस लागत आहेत. पिके काढणीला आली असून शेतकऱ्यांना मजुरांसाठी वणवण फिरावे लागत आहे.

नातेवाईक, मित्रमंडळींच्या मदतीने कापणीला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून पिकांची मशागत व रासायनिक खते, औषधे यावर खर्च केला आहे. शेतीपूर्व मशागत, पेरणी, खत व्यवस्थापन, लावणी, बेणणी, भात कापणी, भरडणी यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.

पाऊस, वातावरण, अचानक पडणारा रोग या कारणांमुळे शेती करणे अडचणीचे होत असताना शेतात काम करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. दोन दिवसांच्या कामाला आठ दिवस द्यावे लागत असल्याने उत्पादनावर परिणाम होऊन उत्पन्न घटत आहे, अशी माहिती उत्रोली येथील प्रगतिशील शेतकरी सचिन विठ्ठल शिवतरे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT