Paddy Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farmers: नोंदणीकृत धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत

Farmer Bonus: पोंभुर्णा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस अजूनही मिळालेला नाही. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

Team Agrowon

Chandrapur News: पोंभुर्णा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस अजूनही मिळालेला नाही. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाली आहे. हजारो शेतकरी अजूनही धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य शासनाने नागपूर हिवाळी अधिवेशनात धान उत्पादकांसाठी हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस आणि दोन हेक्टरपर्यंत मर्यादा अशी घोषणा केली होती. या योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल १,८०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला होता.

चंद्रपूर जिल्ह्याला यंदा २०६ कोटी २ लाख ५४ हजार ६३६ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ही रक्कम जिल्हा मार्केटिंग विभागाच्या खात्यात जमा झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केली असून, अनेकांनी प्रत्यक्षात आधारभूत केंद्रावर धानाची विक्रीदेखील केली आहे. मात्र, केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस मिळाले असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा करण्यात आली नाही.

खरेदी केंद्रांकडून शेतकऱ्यांच्या पावत्या, अहवाल प्राप्त होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम ऑनलाइन जमा केली जाणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाचे म्हणणे आहे.

सात महिन्यांपूर्वी केली होती घोषणा

योजनेची घोषणा होऊन सात महिने झाले तरी प्रत्यक्ष वाटपात विलंब झाला आहे. शेतकऱ्यांनी निवेदन सादर करून न्याय मागितला. यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करण्यासाठी सरकारला पत्रव्यवहार केला. शेतीसाठी अत्यावश्यक असलेला निधी रखडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. यामुळे शासनाविरुद्ध नाराजीचा सूर सर्वत्र आहे.

शासन शेतकऱ्यांची वारंवार थट्टा करीत आहे. यामध्ये आमच्या गरीब कास्तकारांचे मरण होत असते. शासनाने कोणत्याही पद्धतीने मोबदला द्यायचा असेल तर थेट आणि लवकर द्यावा.
- प्रफुल्ल लांडे, शेतकरी, आंबेधानोरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गव्हाचा बाजार स्थिरावला; कांदा भाव दबावातच, हळदीचे दर स्थिर, मक्याला मागणी कायम तर भेंडीला चांगला उठाव

Maratha Reservation: आंदोलनाच्या विरोधात नाही, परंतु नियमांच पालन व्हायला हव; उच्च न्यायालय

Monsoon Livestock Care: घटसर्प, फऱ्या आणि लम्पी रोगांपासून जनावरांच्या रक्षणासाठी ३ सोपे उपाय!

Maratha Reservation: मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झाली महत्वाची बैठक; तोडगा निघाला का?

Girna Dam Storage : गिरणा धरणाची वाटचाल शंभर टक्क्यांकडे

SCROLL FOR NEXT