Paddy Variety Farmer : भाताच्या तब्बल 30 देशी वाणांचं संवर्धन करणारा शेतकरी; भारत सरकारकडून मिळवलं पेटंट

Ratnagiri Farmer : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील शेतकऱ्यांने मुंडगा आणि सरवट या भाताच्या जातींवर संशोधन करत भारत सरकारचे पेटंट मिळवले आहे.
Paddy Variety Farmer
Paddy Variety Farmeragrowon

Ratnagiri Farmer Rice : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील शेतकऱ्यांने मुंडगा आणि सरवट या भाताच्या जातींवर संशोधन करत भारत सरकारचे पेटंट मिळवले आहे. राजापूर तालुक्यातील खरवते येथील प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांनी भाताच्या देशी वाणांवर संशोधन करून लागवड केली. सुमारे ऐशी ते नव्वद वर्षापूर्वी लागवड केली जात असलेल्या आरोग्यदायी तब्बल तीस प्रकारच्या देशी वाणांचे त्यांनी संकलन केले.

त्यामध्ये कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्र, गडचिरोली आदी जिल्ह्यातील वाणांना त्यांनी एकत्रीत करून हे संशोधन केलं आहे. मधुमेह, कर्करोग, सांधेदुखी या आजारांवरील औषधी गुणधर्म असलेल्या कॅल्शियमयुक्त देशीवाणांचा समावेश आहे.

शेतामध्ये गादीवाफे तयार करून देशीवाणांच्या बियाण्यांची चौगुले यांनी सुरू केले. त्या रोपांची लावणी करून त्याद्वारे उत्पादीत होणार्‍या भाताच्या देशीवाणांची बियाणी भविष्यामध्ये कोकणासह अन्य भागातील शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यातून कोकणासह परिसरामध्ये ‘हायब्रीड’ (संकरीत) प्रजातींच्या वाणांच्या युगामध्ये पुन्हा एकदा देशी वाणांची रूजवात होणार आहे. भविष्यामध्ये भाताच्या देशीवाणांची ‘सीड बँक’ विकसित करण्याचा ध्यास असल्याची माहिती चौगुले यांनी दिली.

सुमारे शंभर वर्षापूर्वीपासून शेतकर्‍यांकडून देशी वाणांचा वापर केला जात होता. मात्र, हायब्रीड वाणांच्या वापरामध्ये देशी वाण हद्दपार होवू लागली आहेत. कमी खर्चामध्ये जादा उत्पादन देणार्‍या संकरीत वाणांचा शेतकर्‍यांकडून अधिक वापर होत असला तरी, आरोग्यदायी आणि विविध आजारांमध्ये औषधी म्हणून उपयुक्त ठरणार्‍या देशी वाणांचेही महत्व कमी झालेले नाही.

Paddy Variety Farmer
Rice Water Benefits : औषधापेक्षा गुणकारी भाताचं पाणी; 'या' समस्यांवर अधिक प्रभावी

मात्र, नव्या पिढीला देशीवाणांच्या औषधी गुणधर्माची फारशी माहिती नसल्याचे चित्र दिसत आहे. अशा स्थितीमध्ये विविध औषधी गुणधर्म असलेल्या देशी वाणांचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचा ध्यास श्री. चौगुले यांनी घेतला आहे. या देशी वाणांच्या बियाण्यांचे दिल्ली, उत्तरप्रदेश, आसाम या राज्यांसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, आजरा, गडचिरोली, सिंधुदूर्ग, ठाणे, रत्नागिरी या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील परिसरातील आपल्या मित्रांच्या सहकार्याने संकलन केल्याचे त्यांनी सांगितले.

संकलित केलेली भाताची देशी वाणं

फुलेराधा, जस्मीन, काळा नमक, आजरा घणसाळ, मधुराज, टायचण, रक्तशाळी, बेला, वालय, सरवट, मुंडगा, बकासुळ, काळा जिरगा, इंद्रायणी, दिल्ली राईस, सोरटी, कुडा, गोविंद भोग, पटणी, आसाम बासमती, वाडाकोलम, भोगावती, बासमती, काळी गजरी, फुले समृद्धी, वारंगळ, काळे भात, गोरखपूर एस.बी.के., चंपाकळी अशी आहेत.

कोकण, राज्यातील नव्हे तर, देशभरातील भाताची देशीवाणं ही देवाघरचा दवाखाना आहे. संकरीत वा हायब्रीड बियाण्यांनी उत्पादन जादा मिळत असले तरी, देशीवाणं उत्पादनासह आरोग्यासाठीही खुप उपयुक्त आहेत. त्यामुळे देशीवाणांचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. त्याला शेतकरी, मित्र परिवार आणि कृषी विभागाचे आपणाला सकारात्मक सहकार्य मिळत आहे. भविष्यामध्ये भाताच्या देशीवाणांची ‘सीड बॅक’ विकसित करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. असे दयानंद चौगुले म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com