Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देण्यासाठी प्रयत्न करू, असे आशवासन दिले आहे. तर या बोनससाठी आपण धान उत्पादक शेतकऱ्यांचे वकील होऊ, असेही आश्वासन गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहे. ते रविवारी (ता.१३) गोंदिया येथे धापेवाडा योजनेच्या टप्पा २ व ३ चे भुमिपूजन आणि दुरुस्त झालेल्या वितरिकेचे लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. कोणत्याही क्षणी आचरसंहीता लागण्याची शक्यता आहे. यामुळे महायुती सरकारकडून निर्णय घेण्याचा आणि कॅबिनेट बैठकींचा सपाटा सुरू आहे. या बैठकीतून एका वेळी दोन ते तीन डझनभर शासन निर्णय काढले जात आहेत. याचदरम्यान भरगच्च कार्यक्रम देखील केले जात आहेत. या कार्यक्रमातून सर्वसामान्यांच्या मनावर सरकारची कामगिरी बिंबवली जात आहे. लोकसभेप्रमाणेच सोयाबीन, कापूस, धान आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी आता विधानसभेला घातक ठरू नये यासाठी सत्ताधारी सावध पावले टाकत आहेत.
यादरम्यान धापेवाडा योजनेच्या टप्पा २ व ३ चे भुमिपूजन आणि दुरुस्त झालेल्या वितरिकेचे लोकार्पण सोहळ्यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाना साधत टीका केली. फडणवीस यांनी, मविआ सरकारच्या काळात धानाला बोनस घोषित करण्यात आले. मात्र ते शेतकऱ्यांच्या पदरात पडलेच नाही. पण आमचे सरकार आले आणि आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला असा दावा केला आहे. याआधी धानाच्या बोनसची केवळ आश्वासणे दिली गेली. पण आम्ही शेतकर्यांना आधी १५ हजार नंतर २० हजार धानाला बोनस दिला.
आता तिरोड्यातील शेतकर्यांची मागणी धानास २५ हजार बोनस देण्याची होत आहे. ती ही लवकरच मान्य करू असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच या मागणीसाठी आपण शेतकऱ्यांचा वकील म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करून घेऊ, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या या घोषणेनंतर धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तसेच यावेळी फडणवीस यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत एकूण ५ हजार २१७ कोटींच्या विकासकामांना तसेच नगर परिषद क्षेत्रातील २०५ कोटींच्या विकासकामांना मान्यता दिल्याचे सांगितले. तर या सिंचन योजनेमुळे येथील २ लाख लाख एकर जमीन ओलीताखाली येण्यास मदत होईल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
पूर्व विदर्भासह कोकणपट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ
फडणवीस यांनी केलेल्या घोषणेमुळे सध्या राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याचा लाभ गोंदिया-भंडारासह पूर्व विदर्भातील आणि कोकणपट्ट्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.