Dr. Sanjay Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : तंत्रज्ञानाच्या मदतीने हमखास बागा जगविता येतील

Agriculture Technology Research : तंत्रज्ञानाच्या मदतीने हमखास बागा जगविता येतील, असा आत्मविश्‍वास मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केला.

Team Agrowon

Jalna News : पावसाळ्यात मोसंबी पट्ट्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्याचे विपरीत परिणाम मोसंबी बागांवर जाणवण्यास सुरुवात झाली असल्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने हमखास बागा जगविता येतील, असा आत्मविश्‍वास मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केला.

मोसंबी संशोधन केंद्रात आयोजित मोसंबी कार्यशाळेत (ता. ३१) ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश आहिरे, आत्माचे प्रकल्प संचालक श्रीकांत देशपांडे, उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण, बायरचे विभागीय व्यवस्थापक हर्षल पाटील,

कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. दीपक कच्छवे, बायरचे जिल्हा व्यवस्थापक मिलिंद मिसाळ, कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी रायसिंग सुंदरडे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमास अंबड, कंडारी, वाल्हा, सागरवाडी, नांदापूर, कोनेवाडी, अकोला, निकळक, गेवराई, नानेगाव आदी गावांतील मोसंबी उत्पादक उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, की फळबागा जगविण्यासाठी आच्छादन, ठिंबकचा विवेकी वापर, प्रकाश प्रवर्तकाचा वापर, फळांची विरळणी, पानोळा कमी करून बागा जगविण्यास मदत होईल. डॉ. कच्छवे म्हणाले, की रासायनिक खतांची मात्रा झाडांना विभागून देण्याने झाडाच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. कीड-रोगाच्या नियंत्रणासाठी कीडनाशक, बुरशीनाशक यांचा काटेकोर वापर करण्याचे आवाहन हर्षल पाटील यांनी केले,

तर मोसंबी पिकासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर देणे फायदेशीर असल्याचे डॉ. राकेश आहिरे यांनी सांगितले. या कार्यक्रमास अजिंक्य शिंगारे, देवसिंग घुसिंगे, किशोर कोल्हे, भगवान भोसले, संजय मदन, अंकुश मोरे आदी मोसंबी बागायतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: ज्वारीचा भाव टिकून; गवार तेजीत, जांभळाला उठाव, मुग दबावात, सोयाबीन दर मंदीत

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्यांना विलंब नको

Urea Shortage : युरियाच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी त्रस्त

Go Green Scheme : ‘गो-ग्रीन’मधून वीजबिलात १२० रुपयांची सवलत

Khandesh Water Crisis : टँकर घटले; काही भागांत टंचाई कायम

SCROLL FOR NEXT