Agricultural Land Act: हैदराबाद कूळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियम
Land Ownership Rights: हैदराबाद कूळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९५० कलम ३२-म नुसार कुळाला दिले जाणारे प्रमाणपत्र म्हणजे एका अर्थाने ते खरेदीखत आहे. सामान्यतः एखादी मिळकत विकत घेतल्यास त्याचा दस्त नोंद होतो, सोबत सूची क्र.२ मिळतो. या दोन कागदांना एकत्रितपणे आपण खरेदीखत म्हणतो. या दस्तान्वये आपल्याला मिळकतीची मालकी प्राप्त होत असते.