डाॅ. अरुण भोसले, प्रा. अंजली मेंढे, चंद्रशेखर गुळवेBanana Protection Tips: केळी हे उष्णकटिबंधीय पीक असल्यामुळे ते थंड तापमानास अतिशय संवेदनशील असते. तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास केळीची फळे, झाडे किंवा पानांना चिलिंग इन्जुरी (थंडीमुळे इजा) होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे..सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेले आहे. अशा अतिथंड वातावरणाचा केळी पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सध्या जून लागवडीच्या मृगबाग शाकीय वाढीच्या अवस्थेत, तर ऑक्टोबर लागवडीच्या कांदेबागेतील झाडे स्थिरावून जलद शाकीय वाढीच्या अवस्थेत आहेत. तापमान कमी होईल, तसे नवीन पाने येण्याचा वेग मंदावतो..याचा केळीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. काही ठिकाणी फेब्रुवारी- मार्च तसेच एप्रिल महिन्यात केळी लागवड केली जाते. या बागा सध्या घड तयार होणाच्या अवस्थेत आहेत. थंडीच्या काळात केळीवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी केळी बागेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे..Banana Rate: खानदेशात केळी दरांवर चार महिन्यांपासून दबाव.महत्त्वाची तापमान मर्यादा१३ अंश सेल्सिअस पेक्षा कमी : ताणाची सुरूवात१० ते १२ अंश सेल्सिअस : चिलिंग इन्जुरीची लक्षणे१० अंश सेल्सिअसपेक्षा कमी : फळे व सालीचे गंभीर नुकसान७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी : अपरिवर्तनीय नुकसान, गुणवत्ता ऱ्हासतापमान १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्यास सुरूवात झाल्यानंतर केळी झाडांवर व फळावर विपरीत परिणाम होण्यास सुरूवात होते..झाडावर होणारे परिणाममुळ्यांच्या अन्न व पाणी शोषणाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन पीक वाढीवर परिणाम होतो.पाने निघण्याचा वेग मंदावतो. नवीन येणाऱ्या पानाची पुंगळी उलगडण्यास वेळ लागतो. पुंगळीच्या बाहेरील बाजूवर चट्टे दिसून येतात.झाडांची वाढ मंदावते. एकूण वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो.अन्नद्रव्यांचे शोषण व वहन योग्यरीत्या न झाल्याने पाने पिवळसर दिसू लागतात.केळी घड अडकण्यासारख्या समस्या निर्माण होतात.पानांची कार्यक्षमता कमी होऊन वाढ मंदावते.पिकाची परिपक्वता उशिरा होते. घड कमी भरतात..फळांवर होणारे परिणामसाल काळी पडणे किंवा तपकिरी डाग पडणे.साल निस्तेज, राखाडी किंवा काळी पडणे.सालीमध्ये छोटे खोलगट भाग तयार होणे.साल पातळ, सुरकुतलेल्या सारखी होणे.फळे न पिकणे किंवा असमान पिकणे किंवा कडकपणा वाढणे.गर पाण्यासारखा पारदर्शक होणे. चव बदलणे, वास खराब येणे.बुरशीचा संसर्ग वाढणे..चिलिंग इन्जुरी होण्यामागील कारणेकमी तापमानात पेशींचे नुकसान होते.एन्झाइमची क्रिया बदलते.केळी नैसर्गिकरित्या पिकविणारे इथिलीन हे संप्रेरक (हार्माेन) नीट कार्य करत नाही. परिणामी साल व गाभ्यात रासायनिक असमतोल निर्माण होतो..Banana Farming: थंडीमध्ये केळी बागेत घ्यावयाची काळजी .करावयाचे उपायकेळी लागवडीवेळी सजीव कुंपण लावले नसल्यास बागेभोवती ज्वारी, बाजरी किंवा मका कडबा यांचा झापा करून लावावे. किंवा बागेभोवती हिरवी शेडनेट लावावी. त्यामुळे थंड वाऱ्यांपासून बागेचे संरक्षण होते.जमिनीचे तापमान नियंत्रणासाठी मल्चिंग वापरावे.योग्य परिपक्वतेचे (७५ ते ८० टक्के) घडांची काढणी करावी.केळीच्या खोडाभोवती सेंद्रिय पदार्थ जसे उसाचे पाचट, सोयाबीन भुस्सा यांचे आच्छादन करावे..पीक अवस्थेनुसार शिफारसीप्रमाणे सिंचन करावे. सिंचन शक्यतो रात्री व पहाटेच्या वेळी करावे.केळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पालाश या अन्नद्रव्याची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्यावी.नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा. नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे करपा (सिगाटोका) रोग वाढण्याची शक्यता असते.निसवण सुरू असलेल्या बागेमध्ये घडातील फण्या पूर्ण उमल्यानंतर केळफूल कापावे. तसेच ८ ते ९ फण्या ठेवून शेवटच्या फण्या कापाव्यात..घडाच्या योग्य वाढीसाठी व गुणवत्तेसाठी घडावर सल्फेट ऑफ पोटॅश (२ टक्के) २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी. पहिली फवारणी केळफूल व शेवटच्या फण्या काढल्यानंतर लगेच करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी. दुसरी फवारणी केल्यानंतर केळी घड २ टक्के सच्छिद्रता असलेल्या १०० गेज जाडीच्या पॉलिथिन पिशव्यांनी झाकून घ्यावेत.तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास भल्या पहाटे बागेत ओला काडीकचरा जाळून धूर करावा.नवीन कांदेबागेस २०० ग्रॅम, तर मृग बागेस ५०० ग्रॅम निंबोडी पेंड पावडर प्रति झाड प्रमाणे जमिनीतून द्यावी..करपा रोगअनुकूल हवामानामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. त्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.करपा रोगग्रस्त पाने किंवा पानाचा रोगग्रस्त भाग बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत.नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्राॅपीकोनॅझोल १ मिलि अधिक मिनरल ऑइल १ मिलि प्रति १ लिटर पाण्यात मिसळून आलटून- पालटून फवारणी करावी. पानाचा वरील आणि खालील भाग व्यवस्थित व्यापला जाईल या प्रमाणे फवारणी करावी.- डाॅ. अरुण भोसले ९४०५६ ८५००५(अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.