Chhatrapati Sambhajinagar News : पारंपरिक विणकारांना अद्ययावत करण्यासाठी तसेच नव्याने इच्छुकांना विनकामाचे प्रशिक्षण द्या. कारागिरांची संख्या वाढवा, अशी मागणी पैठणी विणकारांनी वस्त्रोद्योगाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा तसेच उपसचिव तुषार पवार यांच्यासमोर केली. .वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सिन्हा उपसचिव श्री. पवार यांनी बुधवारी पैठण येथील पंचायत समिती सभागृहात पैठणी विणकर कामगारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी रेशीम विभागाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे, वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपायुक्त वसंत घुले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बि.डी डेंगळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती..Skill Development Training : ‘माफसू’च्या पुढाकाराने दिले पशुसखींना कौशल्यवृद्धी प्रशिक्षण.असावली महिला हातमाग विणकर सहकारी संस्थेच्या शशिकला भोसले तसेच पुष्पा पोकळे, जिजाबाई कुंटे यांनी पैठण येथील कारागीर व महिला विणकारांच्यावतीने विविध विषयांची मांडणी अधिकाऱ्यांसमोर केली. लेखी स्वरूपातही मागण्यांची निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले. मागण्यांच्या अनुषंगाने काही सूचना श्रीमती सिन्हा यांनी यंत्रणेला केल्या. .संवादातून महिला विनकारांनी मांडलेल्या समस्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता हा विषय यंत्रनेशी संबंधित आहे. कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध असल्याने त्या पायी कुणी वंचित राहणार नाही याची खबरदारी यंत्रणेनेच घ्यायला हवी, असे श्रीमतीसिन्हा यांनी स्पष्ट केले. विविध राज्यात कारागीर ज्या कल्पकतेने रेशीम वस्त्र निर्मितीमध्ये नवीन प्रयोग करत आहेत. त्याला अनुसरून पैठण मधील कारागिरांनीही आपल्या कल्पकतेला नविन आयाम देण्याचा प्रयत्न करत अधिक भक्कम करावे, असेही त्याम्हणाल्या..Nashik Skill Development : नाशिक जिल्ह्यातील २९ गावांत कौशल्य विकास केंद्रे.या मागण्या दिल्या लेखीशुद्ध रेशीम साहित्य उपलब्ध करून द्या.वैफणी व तुरई यांचे दर व उपलब्धता सुव्यवस्थित करा.महिलांसाठी हातमाग व विणकामाचे प्रशिक्षण सातत्याने आयोजित करा.वीस महिलांचे क्लस्टर करून ते सुरू करा..गुणकर सेवा केंद्र तर्फे नियुक्त डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह मार्फत तांत्रिक मार्गदर्शन व योजनांची अंमलबजावणी करावी.वनकर सेवा केंद्राचे स्थायी स्वरूपात डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह नियुक्त करावे.विणकर केंद्राचे नियुक्त सीडीई मार्फत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.मालाच्या विक्रीसाठी स्थायी बाजारपेठ व त्याकरता जागा उपलब्ध करावी..बैठकीत पुढे आलेले मुद्देकमी जागेत बसणाऱ्या लूमला मंजुरी द्यावी; १८ विणकरांची मागणी.डबल रूमची सक्ती रद्द करावी.६० वर्षांवरील कारागिरांना पेन्शन वेळेत मिळावी.धागा निर्मितीनंतरची पुढील प्रक्रिया मराठवाड्यातच सुरू करावी.मागणी असलेल्या विणकरांना लूम उपलब्ध करून द्यावेत..मागण्यांचा तत्परतेने निर्णय लागल्यास, कारागिरांच्या कौशल्यात वाढ होऊन रोजगार निर्मिती, परंपरागत वस्त्रकला संवर्धन, महिलांचा उद्यमशीलता विकास, वस्त्रद्योग क्षेत्राचा विकास होईल.- शशीकला भोसले, पैठण..हातमाग रेशीम उद्योग व विणकाम क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मागण्यांचा सकारात्मक विचार करून स्थानिक कारागिरांना स्थिर व सन्मानपूर्वक रोजगार मिळण्याची आवश्यकता आहे.- पुष्पा पोकळे, पैठण.२०० युनिट वीज सवलत अनेकांना न मिळाल्याने ती सर्व पात्रांना लागू करावीभाड्याने राहणाऱ्या कारागिरांनाही वीज सवलत लाभ द्यावा.पारंपरिक कारागिरांना गणेशोत्सव भत्ता मिळाला नाही तो मिळावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.